Nitesh Rane on Jarange Patil: जरांगेंचे आंदोलन संपल्यानंतर मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया, "ज्या फडणवीसांवर टीका करत होते, त्यांनीच..."

मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर गेले ५ दिवस नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण केले होते, ज्यात त्यांनी यश मिळवले आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे ही त्यांची मुख्य मागणी होती. सरकारने त्यांच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य केल्या आहेत. दरम्यान जरांगे पाटील यांनी नितेश राणे यांच्यावर मोठी टीका केली होती. ज्यात त्यांनी नितेश राणे यांना चिचुंद्री म्हणून उल्लेख करत राजकीय वातावरण तापवले होते. ज्यावर नितेश राणे काय प्रत्युत्तर देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आंदोलनाच्या दरम्यान जरांगे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती, त्यादरम्यान त्यांनी फडणविसांच्या आई बहिणीवरून अपशब्द काढले होते. ज्यावर मंत्री नितेश राणे यांनी जरांगेवर टीका केली होती. त्यानंतरही नितेश राणे यांनी मराठा आंदोलनाविरुद्ध जरांगेंचा समाचार घेतला होता. ज्याच्या प्रत्युत्तरादाखल जरांगेंची नितेश राणेवर टीका करताना जीभ घसरली. जरांगे यांनी थेट नितेश राणे यांना चिंचुद्री असे म्हणत, "फक्त एकदा आंदोलन संपू द्या, नितेश राणेंना बघतोच अशी धमकी देखील दिली होतिउ.  यानंतर राणे नेमके काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या. शेवटी आता नितेश राणे यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले नितेश राणे?


मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन संपल्यानंतर मंत्री नितेश राणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानताना दिसले. नितेश राणे यांनी मनोज जरांगे यांचे आंदोलन संपल्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, आतापर्यंत जेव्हा मराठा समाजाने गुलाल उधळला, तो देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या कालावधीमध्येच! आता मराठा समाजाने याची दखल घेतली पाहिजे. प्रत्येक मराठा समाजातील नागरिकांने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले पाहिजेत, असे नितेश राणेंनी म्हटले.
Comments
Add Comment

जरांगेच्या डोक्यात शिजतंय काय? मराठ्यांपाठोपाठ आता शेतक-यांचा मसिहा बनणार, बघा कोणत्या केल्या मागण्या

मनोज जरांगेंची सरकारकडे ८ मोठ्या मागण्यांची यादी, शेतकऱ्याला दरमहा १०,००० पगार ते संपूर्ण कर्जमाफी जरांगेंचा

'असे हलके वागणारे माझे नाहीत!' गोंधळ घालणाऱ्या समर्थकांवर पंकजा मुंडे कडाडल्या

भगवान गडाचा वारसा हिरावून घेणाऱ्यांवर पंकजा मुंडेंचा हल्लाबोल बीड:

'जातीपातीचे राक्षस' संपवा! दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं आक्रमक आणि भावनिक आवाहन

'मी गोपीनाथ मुंडेंची बेटी आहे,' म्हणत पंकजा मुंडेंनी जागवल्या आठवणी जा

RSS : कोण शत्रू, कोण मित्र ? हे पहलगामच्या घटनेने शिकवले'

नागपूर : ऐतिहासिक रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव झाला. या उत्सवात बोलताना

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, माजी राष्ट्रपतींची उपस्थिती

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने यंदा नागपूरमध्ये भव्य विजयादशमी

दुकाने, हॉटेल्ससह इतर आस्थापने २४ तास खुली राहणार!

मुंबई : राज्यभरातील दुकाने २४ तास खुली ठेवण्यास परवानगी असणार आहे. राज्यातील महायुती सरकारने हा निर्णय घेतला आहे.