डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्वाणाची वार्ता पोचवणारे दामूदा मोरे यांचे ९२ व्या वर्षी निधन

नागपूर : बाबासाहेब चळवळीतील दामूदा शिवाजी मोरे यांचे निधन झाले आहे. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा संवेदनशील अनुयायी हरपला असल्याच्या शोक संवेदना व्यक्त केल्या जात आहे. दामूदा मोरे यांनी ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाल्याची बातमी शहरभर लाऊडस्पीकरने प्रसारित केली होती. त्यांच्या या बातमीने सर्वत्र खळबळ माजली, तसेच यामुळे त्यांना बाबासाहेबांच्या अनुयायांकडून मरण देखील झाली होती.


पंच्याहत्तर वर्षांपूर्वी नागपुरात सर्वात मोठी मोरे साऊंड सर्विस होती. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या नागपुरात होणाऱ्या सर्व सभांमध्ये मोरे साऊंड लावण्यात येत होता. विशेष म्हणजे, गुलाम अली, जगजितिसंग यांच्या कार्यक्रमात दामूदा यांचीच साऊंड सर्विस असायची. गायक किशोरकुमार यांच्याशी त्यांची जवळीक होती, त्यांच्या कार्यक्रमातही दामुदांची सिस्टिम होती. विशेष असे की, दामुदा यांच्या स्कुटरवर मागे बसून किशोरकुमार शहरात फिरले होते.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १९५६ च्या धम्मदीक्षा सोहळ्यात मोरे कुटुंबियांचा लाऊस्पीकर होता. काका नामदेव मोरे यांच्या सोबत दामूदा यांनीही दीक्षा घेतली होती. सहा डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाल्यावर पहाटे रिक्षात बॅटरी, हातात माईक अन्‌ डोळ्यात अश्रू घेऊन दामूदा आनंदनगर, भानखेडा, नवी शुक्रवारी, कर्नलबाग, जोगीनगर, इंदोरामध्ये ‘बाबासाहेब गेले...'' एवढेच बोलत फिरत होते. तेव्हा काहींनी त्यांना मारहाण केली होती. त्यांच्या निधनाने दामुदा यांच्या या जुन्या आठवणीला पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.


 
Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे