पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकांची जय्यत तयारी : प्राणप्रतिष्ठा आणि मिरवणुकांचे वेळापत्रक जाहीर

  33

पुणे : लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी आता फक्त काही तास उरले आहेत. बुधवारी देशभरात गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात होईल. पुणे शहरात विशेषतः मानाच्या पाच गणपतींची प्राणप्रतिष्ठा आणि मिरवणुका ठरलेल्या वेळेनुसार पार पडणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भक्तगण या मिरवणुकांसाठी रस्त्यावर गर्दी करणार असल्यामुळे पोलीस प्रशासनाकडून विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.


मिरवणुका वेळेत पार पडाव्यात यासाठी संबंधित मंडळांनी वेळापत्रक निश्चित केले असून खाली त्याचा तपशील दिला आहे:


मानाचा पहिला गणपती – कसबा गणपती : या गणपतीची मिरवणूक सकाळी ८ वाजता निघेल . प्रभात बँड आणि ढोलताशा पथकासह मिरवणूक निघेल. प्रतिष्ठापना आध्यात्मिक गुरु आणि लेखक स्वामी सवितानंद यांच्या हस्ते होईल.


मानाचा दुसरा गणपती – तांबडी जोगेश्वरी मंडळ : सकाळी १० वाजता केळकर रस्त्यावरून मिरवणूक निघेल . या गणपतीचे यंदाचे १३३ वे वर्ष आहे . प्रतिष्ठापना प.पू. योगश्री श्री शरदशास्त्री जोशी यांच्या हस्ते होणार आहे. कोल्हापूरच्या
महालक्ष्मी मंदिराची प्रतिकृती मंडळाने उभारली आहे.


मानाचा तिसरा गणपती – गुरुजी तालीम मंडळ : सकाळी ११ वाजता या गणपतीची मिरवणूक निघेल . दुपारी २. ३४ वाजता प्राणप्रतिष्ठा होईल . हे मंडळ यंदा १३९ व्या वर्षात पदार्पण करत असून, आकर्षक फुलांच्या रथातून गणेश मूर्ती आणली जाईल.


मानाचा चौथा गणपती – तुळशीबाग गणपती मंडळ : दुपारी १२. १५ वाजता या गणपतीची प्राणप्रतिष्ठा होईल . यंदा मंडळाचा शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा केला जात आहे. प्रतिष्ठापना निरंजन नाथ महाराज यांच्या हस्ते होईल. यंदा वृंदावनाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.


मानाचा पाचवा गणपती – केसरीवाडा गणपती मंडळ : सकाळी ९ वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीच्या मिरवणूकीला सुरुवात होईल. सकाळी १० ते ११ यावेळेत रोहित टिळक यांचे पुत्र रौनक टिळक यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा केली जाईल. सकाळी ११ वाजता बाप्पाच्या महाआरतीचे नियोजन करण्यात आले आहे .


सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण पाऊल पुणे प्रशासनाकडून उचलण्यात आले आहे . गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मिरवणूक मार्गांवरील सर्व दारू विक्री केंद्रांना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुणेकरांनी गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज होण्यास सुरुवात केली असून, संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण पसरले आहे.

Comments
Add Comment

मुंबईत आंदोलन करण्यास मनोज जरांगे पाटील यांना न्यायालयाची मनाई

मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान येथे उपोषण करण्यास हायकोर्टाने मनाई केली आहे. मराठा

मुख्यमंत्री फडणवीसांच्या ओएसडीने घेतली मनोज जरांगेंची भेट, मोर्चाची तारीख पुढे ढकलण्याची शक्यता

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्य

बीडमध्ये लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक, विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते भिडले

बीड : गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती पेठांमध्ये वाहतुकीची कोंडी

वाहतुकीचा वेग संथ झाल्याने अडचणी पुणे : गणेशोत्सवाला अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असताना मंडई, शनिपार, तुळशीबाग

गणेशोत्सवासाठी प्लास्टिक फुलांची दुकाने सजली...!

फुलशेती कोमेजली, शासनाने प्लास्टिक फूल, हार विक्रीवर बंदी घालावी श्रीरामपूर : एकीकडे प्लास्टिक बंदीचा जागर सुरू

ST Employees Salary: बाप्पा पावले! एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्टचा पगार गणेशोत्सवापूर्वीच मिळणार

मुंबई: राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्याप्रमाणे एसटीच्या सुमारे ८३ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचा