आगामी काळात ई-कॉमर्स आणि टेक स्टार्टअप्समध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीच्या संधी

  25

टीमलीज एडटेक अहवालातील माहिती समोर


बंगळुरू, मुंबई आणि चेन्नई नोकरीच्या संधीमध्ये आघाडीवर


मुंबई:टीमलीज एडटेक (TeamLease Edtech) च्या ताज्या करिअर आउटलुक रिपोर्टनुसार या वर्षातील दुस-या सहामाहीत ई-कॉमर्स आणि टेक्नॉलॉजी स्टार्टअप्स क्षेत्र भारतामध्ये फ्रेशर भरतीचे नेतृत्व करत असून, जुलै–डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी ८८% भरतीचा प्रभावी हेतू दर्शवित आहे. या अहवालात नवख्या उमेदवारांसाठी महत्त्वाच्या उद्योगांमध्ये भरपूर संधी असल्याचे नमूद केले आहे, जिथे रिटेल (८७%) आणि मॅन्युफॅक्चरिंग (८२%) यांचाही फ्रेशर भरतीसाठी मजबूत हेतू दिसून येतो. शहरांमध्ये बेंगळुरू ८१% भरतीच्या हेतूसह आघाडीवर आहे, त्यानंतर मुंबई (६७%) आणि चेन्नई (५९%) यांचा क्रमांक लागतो.माहितीनुसार, जुलै–डिसेंबर २०२५ साठी एकूण फ्रेशर भरतीचा इरादा किंचित घटून ७०% झाला आहे, जो जानेवारी–जून २०२५ च्या तुलनेत ४% नी कमी आहे, तरीही उच्च-वाढीच्या क्षेत्रांमध्ये संधी स्थिर आहेत. या बदलामागे एआय-संचालित कार्यबल पुनर्रचना, जागतिक व्यापारातील अनिश्चितता आणि कोर उद्योगांमध्ये अनुभवी प्रतिभा टिकवून ठेवण्यावर दिला गेलेला धोरणात्मक भर हे प्रमुख घटक आहेत. या अहवालात डिग्री अप्रेंटिससाठी मागणीत सातत्याने वाढ होत असल्याचे नमूद केले आहे, ज्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग (३७%), अभियांत्रिकी आणि इन्फ्रास्ट्रक्चर (२९%) आणि माहिती तंत्रज्ञान (१८%) आघाडीवर आहेत. बेंगळुरू, चेन्नई आणि पुणे अनुक्रमे ३७%, ३९% आणि २६% सह अप्रेंटिसशिप भरतीच्या इराद्यांमध्ये आघाडीवर आहेत. लहान संस्था मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत फ्रेशर्सना भरती करण्याबाबत अधिक उत्सुकता दर्शवत आहेत, जरी त्यांची भरती क्षमता मर्यादित आहे.


अहवालातील निरिक्षणावर भाष्य करताना टीमलीज एडटेकचे संस्थापक आणि सीईओ शांतनू रूज यांनी सांगितले आहे की,'ई-कॉमर्स आणि टेक स्टार्टअप्समधील मजबूत भरतीचा इरादा या क्षेत्राच्या गतिमान वाढीचे द्योतक आहे, ज्यामुळे फ्रेशर्ससाठी अनेक रोमांचक संधी निर्माण होत आहेत. उद्योग जसे-जसे तंत्रज्ञानासह विकसित होत आहेत, तसे-तसे तांत्रिक कौशल्यासह लवचिकता आणि मानवी कौशल्ये असलेल्या फ्रेशर्सना उत्तम संधी प्राप्त होतील. डिग्री अप्रेंटिसशिप प्रोग्राम्समध्ये झालेली वाढ ही कौशल्याधा रित (Skill Oriented) व्यावहारिक शिक्षण मार्गांची मागणी अधोरेखित करते.'


आयओटी इंजिनिअर, क्लाउड इंजिनिअर, प्रोसेस ऑटोमेशन अ‍ॅनालिस्ट, ज्युनिअर एनएलपी डेव्हलपर, कंटेंट मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आणि ज्युनिअर अ‍ॅक्चुअरियल अ‍ॅनालिस्ट या भूमिकांसाठी मागणी कायम आहे. कोर डोमेन कौशल्यांमध्ये सायबर सिक्युरिटी, डेटा स्टोरीटेलिंग, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, सस्टेनेबल एनर्जी सिस्टिम्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्स, अ‍ॅक्चुअरियल सायन्स, जेनेटिक इंजिनिअरिंग, बिझनेस अ‍ॅनालिटिक्स आणि परफॉर्मन्स मार्केटिंग यांचा समावेश आहे. संवाद,नैतिक निर्णयक्षमता, सक्रिय ऐकणे, जुळवून घेण्याची वृत्ती, समस्या सोडवणे, सहकार्य, लवचिकता, डिजिटल साक्षरता आणि वेळेचे व्यवस्थापन यांसारख्या सॉफ्ट स्किल्सना नियोक्ते (Recruiter) अधिक प्राधान्य देत आहेत असेही अहवालाने म्हटले आहे.

Comments
Add Comment

भटक्या कुत्र्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला

नवी दिल्ली : दिल्लीच्या शकरपूर भागात भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा

वांद्रे येथे ५२ फुटी काशी विश्वनाथ मंदिराचा देखावा

मुंबई : दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

बाप्पाच्या आगमनापूर्वी सोने स्वस्त पण चांदी महाग झाली 'ही' आहेत कारणे जाणून घ्या आजचे दर

मोहित सोमण:आज जागतिक अस्थिरतेच्या तोंडावर आज व गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी पुन्हा सोन्यात घसरण झाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना