अकोटमध्ये गाढवांचा अनोखा पोळा

  23

अकोला: अकोट शहरात आज गाढवांचा पोळा पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. देशभरात बैलांचा पोळा साजरा होत असताना, अकोटमध्ये मात्र भोई समाजाकडून गाढवांचा पोळा हा वेगळ्या परंपरेतून साजरा केला जातो..गेल्या पन्नास वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेनुसार गाढवांची पूजा-अर्चा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येते. दिवसभर रंगीबेरंगी सजावट करून पारंपरिक संगीत, ढोल-ताशांच्या गजरात हा अनोखा उत्सव पार पडला.या अनोख्या गाढव पोळ्यामुळे अकोट शहराचे वेगळेपण अधोरेखित झाले असून परिसरात चांगलीच उत्सुकता पाहायला मिळाली.

भारत सारख्या कृषीप्रधान देशात आणि महाराष्ट्रा सारख्या पारंपारिक प्रथा जोपासणाचा राज्या मध्ये पोळा ह्या सणाचे महत्त्व वेगळे सांगावे लागत नाही.पोळ्याच्या दिवशी ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागात सुद्धा बैला प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गावोगावी पोळा भरविला जातो.

बैलां सारखाच उपयुक्त असणारा गाढव या पशु बद्दल सुद्धा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याची पूजा करण्याची परंपरा अकोट मध्ये पाडली जाते. कुंभार आणि भोई समाज द्वारे श्रम सन्मान करण्यासाठी पोळ्याच्या दिवशी गाढवांची पूजा केली जाते बैल पोळ्यासारखा गाढवांचा पोळा भरत नसला तरी पूजा करून त्यांचा मानसन्मान मात्र ठेवला जातो. सकाळीच गाढवांना आंघोळ घालून स्वच्छ केले जाते.त्यांचे अंगावर रंगसंगती साधन विविध रंगाचे पट्टे मारले जातात.या रंगां द्वारे त्यांना सुशोभित केले जाते.

गाढवावर उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबीयांना आता पुढील होण्यासाठी चिंता सतावत आहे. कारण अत्याधुनिक जगात आता गाढवावर होणारे काम कमी झाले आहेत.. त्यामुळे भविष्यात गाढवांचा हा फोटो साजरा होणार की नाही यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे..
Comments
Add Comment

पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेला हिरवा कंदील

राज्य सरकारच्या पायाभूत समितीची मंजुरी पुणे : बहुप्रतिक्षित पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या

विश्वास नांगरे पाटील यांनी शेअर केले शालेय प्रगतीपुस्तक, गुण पाहून व्हाल अचंबित

मुंबई: विश्वास नांगरे पाटील यांनी शालेय जीवनातील इयता आठवीचे प्रगतीपुस्तक सोशल मिडियावर शेअर केले आहे. वार्षिक

बैलपोळानिमित्त बैल धुण्यासाठी नदीवर गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

जालना: राज्यात बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा होत असताना जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बैलपोळा

केळ्यांचा भाव घसरला; उत्पादकांना मोठा आर्थिक फटका

जळगाव: काही दिवसापूर्वी २ हजाराच्या वर गेलेला केळीचा भाव आता १२०० रूपयांपर्यंत घसरल्यामुळे केळी उत्पादकांना

भररस्त्यात हातात चाकू घेऊन मास्क मॅनची दहशत ! नागरिक भयभीत

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या समस्या वाढत आहेत . एकामागोमाग एक अशा गुन्हेगारी घटना पुण्यात घडत असतात .

पुण्यात विसर्जन मिरवणुकीचा वाद अखेर मिटला !

पुणे : पुण्यात गणेशोत्सव मिरवणुकीवरून पेटलेला वाद आता अखेर मिटला आहे . काही मंडळांनी मानाच्या गणपतीच्या