जीएसटी भवनच्या पहिल्या टप्प्यातील इमारतीचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : वडाळा येथे उभारण्यात येत असलेल्या जीएसटी भवनच्या चार पैकी पहिल्या इमारतीचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करावे. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या इमारतीमध्ये मुंबईमधील भाड्याच्या जागेमध्ये असलेली शासकीय कार्यालये स्थलांतरित करावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

 

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती कक्षामध्ये जीएसटी भवन येथे विविध शासकीय कार्यालयांना जागा वाटप करण्याविषयी बैठक झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, जीएसटी आयुक्त आशिष शर्मा यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

जीएसटी भवनची इमारत कार्पोरेट धर्तीवर तयार करावी, असे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, या इमारतीमध्ये शासकीय कार्यालयांना जागा देताना नियमाप्रमाणे जागेचे वाटप करण्यात यावे. सध्या भाड्याच्या जागेमध्ये असलेल्या कार्यालयांच्या जागेची माहिती घेऊन जागा वाटप करावी. जागेचे वाटप झाल्यानंतर शिल्लक राहणारी जागा खासगी कंपन्यांना भाड्याने देण्याबाबत प्रस्ताव करावा. शासकीय कार्यालयांना जागा वाटपासाठी अपर मुख्य सचिव वित्त विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जीएसटी आयुक्त यांची संयुक्त समिती स्थापन करावी,अशा सूचनाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.

 

वडाळा येथील जीएसटी भवन या इमारतीमध्ये उपलब्ध असलेल्या ४ लाख ३० हजार चौ. फूट जागेमध्ये शासनाची कार्यालये असणार आहेत. तसेच या ठिकाणी मेट्रो स्टेशन, उपनगरीय स्टेशन, पूर्व मुक्त मार्ग व अटल सेतू या रस्ते मार्गांची चांगली जोडणी असणार आहे.
Comments
Add Comment

कांदिवलीत उंच इमारतीला आग; आठ जणांना वाचवले

मुंबई : रविवारी सकाळी कांदिवली (पश्चिम) येथील अग्रवाल रेसिडेन्सी या उंच इमारतीत लागलेल्या आगीने परिसरात खळबळ

MPSC 2026 चे वेळापत्रक जाहीर, सविस्तर वाचा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, गुंदवलीवरून थेट गाठता येणार मिरा रोड

मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या गुंदवलीवरून निघालेली मेट्रो दहिसर पूर्व

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास