पोलीस भरतीचा जीआर आला; महाराष्ट्रात १५,६३१ पदांसाठी मेगाभरती!

मुंबई: महाराष्ट्र पोलीस दलात भरती होण्याची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने तब्बल १५,६३१ पदांच्या मेगाभरतीसाठी शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या निर्णयानुसार, पोलीस शिपाई, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.


काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या भरतीला मान्यता देण्यात आली होती आणि आता त्याचा अधिकृत जीआर प्रसिद्ध झाला आहे.




  • पोलीस शिपाई पदासाठी १२,३९९ जागा

  • पोलीस शिपाई चालक पदासाठी २३४ जागा

  • बॅंड्समनसाठी २५ जागा

  • सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी २,३९३ जागा

  • कारागृह शिपाईसाठी ५८० जागा 


या भरती प्रक्रियेसाठी काही महत्त्वाचे नियम जाहीर करण्यात आले आहेत.



वयोमर्यादेत सूट: सन २०२२ आणि २०२३ मध्ये ज्या उमेदवारांनी संबंधित पदांची कमाल वयोमर्यादा ओलांडली होती, त्यांना एक विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.


परीक्षा पद्धत: ही भरती प्रक्रिया घटकस्तरावरुन राबवली जाईल आणि लेखी परीक्षा OMR आधारित पद्धतीने घेतली जाईल.


परीक्षा शुल्क: खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५० रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५० रुपये शुल्क आकारले जाईल.


पारदर्शकता: या भरती प्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी आणि नियंत्रण पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे असेल, जेणेकरून भरती पारदर्शक आणि सुरळीत पार पडेल.


ही भरती प्रक्रिया १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत रिक्त झालेली आणि रिक्त होणारी पदे भरण्यासाठी आहे. यामुळे राज्यातील तरुणांना शासकीय सेवेत येण्याची मोठी संधी मिळणार आहे.

Comments
Add Comment

पोलिसांनी १२ मुलांना भीक मागण्यापासून वाचवले

शिर्डी: साईबाबा मंदिराच्या धार्मिक स्थळांवर भीक मागण्यासाठी जबरदस्तीने लावलेल्या १२ मुलांना शिर्डी पोलिसांनी

शिर्डीत बाल हक्कांची पायमल्ली? पोलिसांचा कठोर इशारा!

अल्पवयीन मुलांकडून भिक्षा व विक्री करविणाऱ्या पालकांविरोधात गुन्हे दाखल शिर्डी : जगप्रसिद्ध साईबाबांच्या

बीडमध्ये पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू

बीड : बीडच्या (Beed) अंबाजोगाईमध्ये (Ambajogai) पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

माजी उपसरपंचाच्या आत्महत्येनंतर नर्तिका पूजा गायकवाडच्या फॉलोअर्समध्ये वाढ!

बीड: बीडच्या गेवराईतील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी स्वतःवर गोळी झाडून

कोणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये; मंत्री छगन भुजबळ यांचे ओबीसी बांधवांना आवाहन

ओबीसी आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या कुटुंबियांचे भुजबळांनी केले सांत्वन, म्हणाले... लातूर: मनोज

रेशनच्या तांदळात आढळला मृत साप

सोलापूर : सोलापूर शहरातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. मागील दोन