Local Train Update: रेल्वे रुळांवर पाणी, लोकल ट्रेन उशिराने सुरू

मुंबई: मुंबई तसेच आसपासच्या परिसरात पावसाने सोमवारपासून धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे मुंबईकरांची दैना उडाली आहे. मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी साचले आहे. तर मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवाही ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.

मुंबईत जागोजागी पाणी भरल्याने लोकल वाहतुकीला याचा मोठा फटका बसला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक ४० मिनिटे उशिराने सुरू आहे तर हार्बर रेल्वेची वाहतूकही अर्धा तास उशिराने सुरू आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्या १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वेमार्गावरील घाटकोपर ते दादर परिसरात रेल्वे रुळांवर मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. तर माटुंगा रेल्वे स्थानकातील रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.

हवामान खात्याने मुंबईत पुढील तीन ते चार तासांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे सखल भागात असणारी रेल्वे स्थानकं पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. कुर्ला आणि घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या परिसरात मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्याप्रमाणावर पाणी साचल्याने प्रवाशांना स्टेशनपर्यंत पोहोचणेही अवघड झाले आहे.
Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा २१ वा स्थापना वर्धापन दिन; वरळी डोममध्ये भव्य कार्यक्रम

मुंबई : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या २१ व्या स्थापना वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र

Ghatkopar Landslide Accident : जखमी नागरिकांना ५० हजारांची मदत तर मृतांच्या वारसांना ४ लाख; महापौर रितू तावडे यांनी केली घोषणा

मुंबई : कुर्ला पश्चिमेतील अशोक नगर, टेकडी क्रमांक ३ येथे बुधवारी (१२ ऑगस्ट २०२६) पहाटेच्या सुमारास भूस्खलनाची

Practical Marathi knowledge for Drivers : प्रवासी वाहनचालकांना आता व्यवहारिक मराठी अनिवार्य! नियम मोडल्यास ३ महिन्यांपर्यंत परवाना निलंबित, पुढे कायमचा रद्द होणार

मुंबई : महाराष्ट्रात प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहनचालकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Rename Of Clean Mumbai Awareness Campaign : मुंबईत स्वच्छतेच्या कामांत आता 'प्रबोधन' नाही तर 'सेवा'

- ठाकरेंच्या काळातील स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान हे नाव बदलले - भाजपच्या काळात आता बृहन्मुंबई स्वच्छता सेवा

BMC : मुंबईतील ओसी नसलेल्या इमारतींच्या मार्गात अडथळा; स्थायी समितीत प्रस्ताव मंजुरीनंतर महापालिका सभागृहात लटकला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत अनेक विकासकांनी मंजुर आराखड्याची पुतर्ता न करता बांधकाम केले आहे, अशा

BMC News : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या चार मुख्य जलवाहिन्यांचा एसआरए योजनेला अडथळा

- जलवाहिनी स्थलांतरीत करून योजना राबवली जाणार - महापालिका सुधार समितीत प्रस्ताव सादर मुंबई (विशेष