कंपनीच्या कामकाजातून मिळालेल्या महसूलात (Revenue from Operations) मध्ये मागील वर्षाच्या तिमाहीतील १०५०८ कोटींच्या तुलनेत वाढ होत यातिमाहीत ११०२३ कोटींचा महसूल मिळा ला आहे. ही वाढ ५% होती. म्हणजेच प्रत्येक ग्राहकांकडून मिळणाऱ्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर १५% वाढ झाली आहे. मागील तिमाहीत हा महसूल १५४ कोटी होता तो वाढत या तिमा हीत १७७ कोटी रुपये झाला आहे.
माहितीनुसार, कंपनीच्या ईबीटा (करपूर्व कमाईत EBITDA) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १०% वाढ झाली होती. मागील वर्षाच्या तिमाहीतील ४२०५ कोटींच्या तुलनेत यावर्षी तिमाहीत ४६१२ कोटींवर कमाई वर गेली आहे. विशेषतः ईबीटा मार्जिनमध्ये १८० (बीपीएस) बेसिस पूर्णांकाने वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तिमाहीत हे मार्जिन ४०% होते ते वाढत यावेळी ४१.०८ % वर पोहोचले परिणामी कंपनीच्या फंडामेंटलमध्ये सु़धारणा झाल्याने शेअर बाजारात कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. मागील चौथ्या तिमाहीत तोटा ७१६६ कोटी रुपयांवरून क्रमिक आधारावर कमी झाला तर टॉपलाइन कामगिरी तिमाही आधारावर स्थिर झाली होती. व्होडाफोनने १३ मंडळांमधील २२ शहरांमध्ये 5G सेवा सुरू केल्या आहेत तर त्यांचा 4G विस्तार सुरू आहे. ग्राहकांच्या तोट्यात ९०% घट झाल्यामुळे त्यांच्या धोरणात्मक गुंतवणुकीचा फायदा झाला आहे असे कंपनीने तिमाही निकाल जाहीर करताना म्हटले आहे.
कंपनीची एकूण ग्राहकसंख्या (Subscriber) १९७.७ दशलक्ष होती. तिमाहीतील आकडेवारी कंपनीने १२७.४ दशलक्ष ४G/५G ग्राहक होती. जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील १२६.७ दशलक्ष होती. कंपनीने म्हटले आहे की गेल्या तीन तिमाहीत 4G कव्हरेज वाढवण्यासाठी केलेल्या गुंतवणुकीचे परिणाम दिसू लागले आहेत, जे गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीच्या तु लनेत ९०% कमी ग्राहक तोटा दर्शविते, विलीनीकरणानंतरची ही सर्वात कमी घट आहे.
याशिवाय एकूणच संपूर्ण निकालावर भाष्य करताना कंपनीच्या कमाईवर भाष्य करताना मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षया मुंद्रा यांनी पहिल्या तिमाहीला 'निर्णायक टर्नअराउंड' तिमाही म्हटले आ हे.'गेल्या तीन तिमाहीत आमच्या 4G कव्हरेजचा विस्तार करण्यासाठी केलेल्या गुंतवणुकीचे परिणाम दिसू लागले आहेत, जे गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमा ही च्या तुलनेत ९० % कमी ग्राहक तोटा यातून दिसून येते, जो विलीनीकरणानंतरचा सर्वात कमी ग्राहक घट आहे.आमच्या 5G सेवा आता १३ मंडळांमधील २२ शहरांमध्ये कार्यरत आहेत आणि वाढत्या अनुषंगाने आ म्ही आमच्या 5G फूटप्रिंटचा पद्धतशीरपणे विस्तार करण्यास वचनबद्ध आहोत.' असे म्हटले.