गुहागर : चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी १५० गाड्यांचं बुकिंग

  29

गुहागर आगारातून जास्तीत जास्त चाकरमान्यांना एसटी महामंडळाची सेवा दिली जात असून आतापर्यंत परतीच्या प्रवासासाठी 150 गाड्यांचे बुकिंग झाले आहे. तर येणाऱ्या फेऱ्या धरून यावर्षी 500 गाड्यांचे उद्दिष्ट गाठणार असल्याची माहिती गुहागर आगारप्रमुख अशोक चव्हाण यांनी दिली.गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एस. टी. महामंडळाचे गुहागर आगार सज्ज राहिले आहे. मुंबई व पुणे या भागातून तब्बल अडीचशे ते पावणेतीनशे गाड्या गुहागर तालुक्यात येण्याचे नियोजन झाले आहे.

तर गुहागर तालुक्यातून परतीच्या प्रवासासाठी आतापर्यंत 150 गाड्यांचे बुकिंग झाले आहे. यामध्ये 50 गाड्या ऑनलाईन तर 100 गाड्यांचे ग्रुप बुकिंग झाले आहे. 2 सप्टेंबरपासून परतीचा प्रवास होणार आहे. त्यामुळे या गाड्यांच्या संख्येमध्ये आणखी वाढ होईल. मुंबई, बोरीवली, ठाणे, नालासोपारा, विठ्ठलवाडी, स्वारगेट, पिंपरी-चिंचवड अशा एस. टी. फेऱ्या आहेत.

नालासोपारा येथील चाकरमान्यांना परतीच्या प्रवासासाठी वाहन मिळावे याकरिता गुहागर आगारातील वाहतूक नियंत्रक नालासोपारा डेपोमध्ये पाठविण्यात आले असून त्यांच्या मार्फतही परतीच्या प्रवासासाठी ग्रुप बुकिंग घेतले जात आहे.

त्याचबरोबर 27 ऑगस्टपासून गुहागर आगारातून बोरीवली व पिंपरी-चिंचवड अशा दोन जादा एस. टी. फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. पिंपरी-चिंचवडकरीता शिवशाही वाहतूक करणार आहे. ग्रुप बुकिंग व्यतिरिक्त दररोज सकाळी व सायंकाळी मुंबई, भांडूप, नालासोपारा, स्वारगेट, पिंपरी-चिंचवड या फेऱ्या सुरू राहणार आहेत.

गुहागर आगारात दाखल होणाऱ्या वाहनांना गुहागर आगार व पोलिस परेड मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील साईट पट्टी खोदाई झाल्याने शृंगारतळी येथे पार्किंगसाठी खासगी जागा घेतली जाणार आहे. येणाऱ्या चालक-वाहकांची शहरातील भंडारी भवन सभागृहात राहण्याची व्यवस्था केली जात असून याबाबत सभागृह चालकांबरोबर बोलणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. गुहागर आगारात केवळ 64 एस. टी. गाड्या असून नियमित फेऱ्या कायम ठेवून बाहेरून येणाऱ्या गाड्यांच्या माध्यमातून चाकरमान्यांना परतीची सेवा दिली जाणार आहे.

 

 
Comments
Add Comment

दापोली : मुसळधार पाऊस, खेड-दापोली रस्ता बंद, असोंडमध्ये रस्ता वाहून गेला

दापोली तालुक्यातील वाकवली–उन्हावरे मुख्य रस्त्यावर असणाऱ्या असोंड गावातील एसटी स्टँडवरून कुंभारवाडीकडे

चिपळूण, खेड, दापोलीत मुसळधार पाऊस, पाहा कोकणातील पावसाचे अपडेट

गेल्या दोन दिवसापासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे,

किनारपट्टीला ‘एरिन’ चक्रीवादळाचा धोका, हवामान विभागाचा अलर्ट

राज्यात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने तडाका दिलाय. अटलांटिक महासागरातून येणारे ‘एरिन’ चक्रीवादळ आता वेगाने

आजही पाऊस बरसणार, कोकण,मुंबई, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासाठी पावसाचा अलर्ट

गेल्या दोन दिवसात पावसाने राज्यात सर्वदूर हजेरी लावली असून हवामान विभागाने आजही पावसाचा इशारा दिला आहे.

गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीच्या 2500 फेऱ्या

कोकणात गणेशोत्सवासाठी येणार असलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी अडीच हजार एसटी गाड्यांचे नियोजन

कोकणात पुढील 4 दिवस विजांसह मुसळधार पावसाचा इशारा

राज्यभरात सध्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून कोकणात पुढील ४ दिवस विजांसह मुसळधार पावसाचा इशारा