पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे आणि त्यातून होणारे अपघात (Pune Accident News) या घटनांत चिंताजनक वाढ झाली आहे. अशाच धक्कादायक घटनेत, मद्यधुंद चालकाने थेट पुणे वाहतूक विभागाचे डीसीपी हिम्मत जाधव यांच्या गाडीला धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना काल (शुक्रवार, १५ ऑगस्ट) रात्री सुमारास दहा ते साडेदहा दरम्यान केशवनगर परिसरात घडली. धडकेमध्ये डीसीपी हिम्मत जाधव यांची गाडी मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली, तर त्यांच्या मुलीला किरकोळ दुखापत झाल्याचे समजते. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची गंभीर दखल घेत मुंढवा पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध ड्रिंक अँड ड्राईव्ह (Drink And Drive) या कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरू असून, मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.
मुंबई : राज्यभरात आज गोकुळाष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यानिमित्ताने दहीहंडी उत्सवाची धूम शहरापासून उपनगरांपर्यंत सर्वत्र पाहायला ...
मुलगी किरकोळ जखमी, दोन जण अटकेत
शहरातील केशवनगर परिसरात शुक्रवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक अपघाताने नागरिकांना हादरवून सोडले. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या चालकाने थेट वाहतूक विभागाचे डीसीपी हिम्मत जाधव यांच्या अधिकृत गाडीला जोरदार धडक दिली. या अपघाताची नोंद मुंढवा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. ही घटना रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. धडकेत डीसीपी जाधव यांची गाडी नुकसानग्रस्त झाली असून, त्यांच्या मुलीला किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, मुंढवा पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी वाहनचालकासह दोन जणांना ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात आरोपी दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांच्या विरोधात ड्रिंक अँड ड्राईव्ह तसेच संबंधित कायद्यांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांत मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवण्याच्या आणि त्यातून अपघात घडण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे या घटनेनंतर वाहतूक पोलिसांनी अधिक काटेकोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.