Nagpur Blast : नागपूर कारखाना स्फोट; पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

नागपूर येथील कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला, आणि मृतांच्या कुटुंबीयांना भरपाईची घोषणा करण्यात आली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवर लिहीले की, "महाराष्ट्रातील नागपूर येथील कारखान्यात झालेला स्फोट अत्यंत दुःखद आहे. मृतांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या तीव्र संवेदना आहेत. जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी मी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन बाधितांना मदत करत आहे."


पीडितांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) कडून आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. प्रत्येक मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत दिली जाईल. घटनेत जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला अतिरिक्त ५०,००० मदत दिली जाणार आहे.





नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या राहुळगांव स्थित एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत झालेल्या स्फोटात १५ जण ठार झाले. नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनेला दुजोरा दिला असून जखमींचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही.


नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे आज सकाळच्या सुमारास एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. बारुद आणि त्यापासून डेटोनेटरसह इतर स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत हा मोठा स्फोट झाला. या भीषण स्फोटात आतापर्यंत या भीषण स्फोटत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर नागपुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे ते संभाजीनगर २ तासांत, तर मुंबई-बंगळुरू अवघ्या ५ तासांत! नितीन गडकरींनी मांडला महामार्गांचा 'मास्टर प्लॅन'

पुणे : महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक व्यवस्था अधिक गतीमान करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

History of Ukadiche Modak : गणपती बाप्पा आणि मोदकाचं अतुट नातं! काय आहे उकडीच्या मोदकाचा पौराणिक आणि रंजक इतिहास?

मुंबई : गणेशोत्सव असो वा संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी 'मोदक' हा अग्रस्थानी असतो. लहानपणापासूनच

Auto Driver Marathi Test : ७ हजार ७५० रिक्षाचालक मराठी परीक्षेत नापास, ३० दिवसांची अंतिम मुदत

मराठी शिकण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचे परमिट रद्द करणार मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी लागू करण्यात

Bhimashankar Accident : भीमाशंकर महामार्गावर भीषण अपघात; 2 रिक्षांना कारची धडक, 12 जण गंभीर जखमी

पुणे : श्रावण महिना, वीकेंडची सुट्टी आणि सोमवार असल्याने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर

Pune Crime : पुण्यात रीलस्टार तरुणीचा 19 वर्षीय तरुणावर हल्ला; दोन तरुणींसह तिघांना अटक

पुणे :  पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात किरकोळ वादातून 19 वर्षीय तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली

Maharashtra Weather : पावसाची प्रतीक्षा कायम! कोकण-घाटमाथा वगळता राज्यात जोरदार सरींची शक्यता कमी

मुंबई : ऑगस्टचा पंधरवडा संपत आला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही.