पुण्यात पसरला विषारी धूर, ५ विद्यार्थी रुग्णालयात; २० हजार विद्यार्थ्यांच्या कॉलेजला सुट्टी, एक कंपनी बंद

पुणे : पुण्यात लोणी काळभोर परिसरात मुळा-मुठा नदीपात्रात निमयित मोठ्या प्रमाणात कचरा टाकून तो जाळला जात आहे. या कचऱ्यामुळे विषारी धूर पसरला आणि पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. या विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून नदीपात्राजवळ असलेल्या एका कंपनीने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना एक दिवसाची विशेष सुट्टी जाहीर केली. तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी एमआयटी शैक्षणिक संकुलाने संकुलात शिकणाऱ्या २० हजार विद्यार्थ्यांना एक दिवसाची विशेष सुट्टी दिली.


पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाने नदीपात्रातील कचऱ्याला लावलेली आग नियंत्रणात आणली. नदीपात्रातल्या कचऱ्यात नेमके कोणते घटक होते हे जाणून घेण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने तपास सुरू आहे. नदीपात्रातील पाण्याचे आणि कचऱ्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी प्रशासनाने विशेष व्यवस्था करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.


नदीपात्रात कचरा सतत टाकला जात असल्याने आग वारंवार भडकत असल्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी सांगितले. या प्रकरणी तपासातून अधिक माहिती हाती येईल, असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

Raigad News: आईने चार मुलांना विषारी थंडपेय पाजून स्वतःही केले विषप्राशन; तिघांचा मृत्यू, दोन मुलांची प्रकृती गंभीर

रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण

Palghar Crime : पालघरमध्ये भररस्त्यात तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; CCTV व्हायरल, प्रकृती चिंताजनक

Palghar Crime : पालघर : पालघर (Palghar) शहरात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला (Attack) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली

Crime News: धक्कादायक! लग्नात अडथळा ठरत असल्याने प्रेयसीची निर्घृण हत्या; शिक्षकासह वडील आणि मामा अटकेत

दोडामार्ग: प्रेमसंबंधातून सुरू झालेल्या नात्याचा शेवट एका धक्कादायक हत्याकांडात (Murder) झाला आहे. कर्नाटकातील

Maharashtra Monsoon Weather Alert : महाराष्ट्रात निसर्गाचा लहरी खेळ! कुठे मुसळधार पाऊस, तर कुठे उष्णतेची लाट; मान्सून कधी येणार?

केरळमध्ये वेळेवर दाखल झाल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे ६ जून रोजी महाराष्ट्रात प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर

Bhimashankar Temple : भाविकांसाठी आनंदाची बातमी! 5 महिन्यांनंतर भीमाशंकर मंदिर 15 जूनपासून खुले; गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था

पुणे: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर (Bhimashankar Temple) हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तब्बल पाच ते सहा

Wari 2026: लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

मुंबई दि. १३ जून : पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांना