Holi 2026 : रंग-पिचकाऱ्यांच्या किंमतीत सरासरी पाच टक्के वाढ, तरीही खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद

अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा रंगांनी न्हाऊन निघाल्या आहेत. होळीनंतर दुसऱ्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या धुलिवंदन सणासाठी लागणारे पर्यावरणपूरक रंग आणि विविध आकारांच्या रंगीबेरंगी पिचकाऱ्या बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या आहेत. मात्र यंदा रंग व पिचकाऱ्यांच्या किंमतीत सरासरी पाच टक्क्यांची वाढ झाल्याने ग्राहकांना किंचित अधिक पैसे मोजावे लागत आहेत.


यंदा होळी सोमवारी २ मार्च रोजी असून त्यानंतर मंगळवारी धुलिवंदन साजरे केले जाणार आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातही रंगांची उधळण करण्याची परंपरा उत्साहात पाळली जाते. त्यामुळे बाजारात साध्या पिचकाऱ्यांपासून बंदूक प्रकार, टँकर पिचकाऱ्या तसेच लहान मुलांसाठी आकर्षक डिझाइन उपलब्ध झाली आहेत. विशेष म्हणजे छोटा भीम, बेन १० आणि बार्बी यांच्या चित्रांसह पिचकाऱ्यांना मोठी मागणी आहे.


पिचकाऱ्यांच्या किंमती १० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत आहेत. काही ठिकाणी दर स्थिर असले तरी अनेक ठिकाणी ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमतीमुळे दरवाढ अपरिहार्य ठरल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.


महागाईची झळ बसत असली तरी सणाचा उत्साह कमी झालेला नाही. अलिबागसह जिल्ह्यातील विविध बाजारपेठांत खरेदीला सुरुवात झाली असून सुमारे २५ टक्के खरेदी पूर्ण झाल्याचे विक्रेते संदेश तुणतुणे यांनी सांगितले. धुलिवंदनच्या आदल्या दोन दिवसांत ग्राहकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना

Eknath Shinde : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

जनतेच्या दारात दर्जेदार उपचार पोहोचवण्याचा निर्धार मुंबई : “हे सरकार फक्त आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात