Mumbai Heavy Rain: दहीहंडीच्या दिवशीच पाऊसाची जोरदार हजेरी, मुंबईत अनेक भागात साचले पाणी, वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत

दहीहंडीच्या उत्सवासाठी लोकांची संभाव्य गर्दी पाहता हवामान खात्याचे घराबाहेर न पडण्याचे आवाहन 


मुंबई: मुंबईत काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे आणि वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी रेड अलर्ट आणि ठाणे आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे अति मुसळधार पाऊस रात्रीपासून सुरू आहे.


दरम्यान विक्रोळी परिसरात दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे आणि दोघे जखमी झाले आहेत. कुलाबा आणि सांताक्रूझमध्ये अनुक्रमे ४५.२ मिमी आणि ११.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जोरदार समुद्री वाऱ्यांमुळे मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे.



रेल्वे ट्रॅकवर साचले पाणी, रेल्वे वाहतूक व्यवस्था विस्कळीत


काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हार्बल तसेच मध्य रेल्वे मार्गिकेवरील काही ट्रॅकवर पाणी साचू लागले आहेत. मुंबईतील कुर्ला आणि विद्याविहार दरम्यानच्या रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत.  रेल्वे प्रशासनाने पाणी काढण्यासाठी पंप लावले असले तरी पाण्याचा निचरा होत नसल्याचे दिसून येत आहे. ज्यामुळे लोकल ट्रेनची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. तसेच किंग्ज सर्कल, दादर, माटुंगा आणि सायन यांसारख्या सखल भागांमध्ये गुडघाभर पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूकही मंदावली आहे.


पुढील २४ तासांत मुसळधार पाऊसाची शक्यता असून, दहीहंडीच्या उत्सवासाठी लोकांची संभाव्य गर्दी पाहता हवामान खात्याने घराबाहेर न पडण्याचे आवाहन लोकांना केले आहे.



पुढील तीन ते चार दिवस मुंबई आणि कोकण प्रदेशासह इतर जिल्ह्यात मुसळधार पाऊस


महाराष्ट्रातील वाशिम आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती आहे, तर बीडमधील जिल्हा रुग्णालयाचे जीर्ण छत कोसळल्याने एक रुग्ण जखमी झाला आहे. हवामान विभागाने इशारा दिला आहे की पुढील तीन ते चार दिवस मुंबई आणि कोकण प्रदेशासह देशाच्या इतर भागात मुसळधार पाऊस सुरू राहू शकतो.

Comments
Add Comment

मोनोरेल, मेट्रो सेवांसाठीचा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा...

जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्षांच्या दिल्या अशा सूचना मुंबई (खास प्रतिनिधी) : सार्वजनिक वाहतूक

जागतिक तणावाच्या काळात भारत जगासाठी दीपस्तंभाची भूमिका बजावेल!

मुंबईत पंतप्रधान मोदींचे जागतिक सीईओ फोरममध्ये प्रतिपादन मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवारी)

तुम्हाला वारंवार Spam कॉल येतात का? तर आता नो टेन्शन कारण...

आता अनोळखी नंबरसह मोबाईलवर दिसेल कॉल करणाऱ्याचं नाव मुंबई : दूरसंचार क्षेत्रात मोठा बदल होत

स्टारलिंकची भारतात एंट्री, मुंबईत होणार डेमो रन

मुंबई : एलॉन मस्क यांच्या मालकीची स्टारलिंक कंपनी भारतात सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. ३०

देशभरात १ नोव्हेंबरपासून आधार, बँकिंग व एलपीजीवर नवे नियम होतील लागू

मुंबई : देशभरात १ नोव्हेंबरपासून अनेक महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत, ज्यांचा थेट परिणाम सामान्यांच्या दैनंदिन

Bmc election 2025: प्रतिक्षा संपली,मुंबई महापालिकेच्या प्रभागांचे आरक्षण सोडत येत्या ११ नोव्हेंबरला...

मुंबई (खास प्रतिनिधी) : राज्यातील २८ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग आरक्षणाचा