'उबाठा' गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेग


मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाचे दोन अंक पूर्ण झाल्यानंतर आता तिसऱ्या अंकाची म्हणजेच फुटीच्या 'पार्ट-३'ची तयारी सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 'उबाठा' गटाचे लोकसभेतील ९ पैकी निम्म्याहून अधिक खासदार सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून, ते लवकरच सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे.


एकनाथ शिंदे यांनी आपली पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि संसदेत शिवसेनेचे वजन वाढवण्यासाठी हे विशेष 'मिशन' हाती घेतल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उबाठा गटाचे ५ ते ६ खासदार शिवसेनेच्या संपर्कात असून त्यांनी सत्ताधारी पक्षात येण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या दिल्ली दौऱ्यानंतर या राजकीय हालचालींना वेग आला. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून, संभाव्य पक्षप्रवेशावर सविस्तर चर्चा केल्याचे शिवसेना सूत्रांकडून समजते.


या भेटीनंतर शिंदे यांनी इच्छुक खासदारांच्या नावांची यादी तपासून पाहिली असून, त्यांच्या प्रवेशाबाबत कायदेशीर पेच निर्माण होऊ नये, यासाठी नामवंत तज्ज्ञांशी सल्लामसलत सुरू केली आहे. पक्षांतरादरम्यान कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, यासाठी अत्यंत गुप्तता पाळून ही रणनीती आखली जात आहे.



कायदेशीर सल्लामसलत सुरू


सध्या शिवसेकडून या सर्व खासदारांच्या अधिकृत प्रवेशासाठी कायदेशीर सल्लामसलत सुरू आहे. अपात्रतेची टांगती तलवार टाळून हे कसे शक्य होईल, याचा सखोल आढावा घेतला जात आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच मोठा राजकीय 'धमाका' होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक