चिकन मटण विकण्यास बंदी, खाण्यास नाही; केडीएमसी प्रशासनाने दिली माहिती

डोंबिवली : स्वातंत्र्यदिनी कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत चिकन मटण आदी मांसाहार खरेदी विक्री करण्यास बंदी आहे. पण हे पदार्थ त्या दिवशी घरी कोणी खात असेल तर त्यावर बंदी नाही. यामुळे स्वातंत्र्यदिनी चिकन आणि मटण यांची विक्री सुरू असल्याचे आढळले तर संबंधित दुकानदाराचा परवाना जप्त केला जाईल, असे कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. महापालिकेला अधिनियमानुसार मिळालेल्या अधिकारात १९८८साली घेण्यात आलेल्या निर्णयाची आपण अंमलबजावणी केली असल्याचे पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितले. त्यांनी निर्णयावर ठाम असल्याचेही जाहीर केले.

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत १९८८ च्या तत्कालीन प्रशासकांनी गणेशोत्सव, १५ऑगस्ट यासह पाच ते सहा दिवस शहरात कत्तलखाने आणि चिकन मटण विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढले होते. तेव्हापासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू आहे. पण आता महापालिकांच्या निवडणुका जवळ आल्याचे लक्षात येताच राजकीय पक्षांनी या मुद्यावरुन राजकारण सुरू केल्याची चर्चा आहे.

राजकीय पक्षांनी पालिका मुख्यालयाच्या आवारात मांसाहार करू आणि कोंबड्या सोडू असे इशारे देत आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. विरोधकांनी निर्णय मागे घेण्यासाठी आयुक्तांवर दबाव आणला आहे. याचवेळी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या महापालिकांनीही केली आहे. यामुळे निर्णयावर ठाम असल्याचे कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल म्हणाले.
Comments
Add Comment

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

गावची जमीन गावातच, मोरवणे ग्रामसभेच्या ठरावाची सर्वत्र चर्चा

रत्नागिरी : कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण तालुक्यातील मोरवणे गावाच्या ग्रामसभेने एक ठराव केला आहे.