राजस्थान: खाटूश्यामजी मंदिरातून परत येणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात, १० ठार

  36


जयपूर: राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. खाटूश्यामजी मंदिरातून दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला मोठा अपघात झाला आहे. या अपघातात ७ मुले आणि ३ महिलांसह १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर २० जण जखमी झाले आहेत.


मनोहरपूर राष्ट्रीय महामार्गावर सैंथल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बापी गावाजवळ हा अपघात घडला. भाविक एका पिकअप गाडीतून प्रवास करत होते. याच वेळी त्यांची गाडी एका कंटेनरला धडकली. या धडकेत पिकअप गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला.


घटनेची माहिती मिळताच सैंथल पोलिसांचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी ८ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.


हे सर्व भाविक उत्तर प्रदेशातील एटाह येथील रहिवासी होते आणि ते खाटूश्यामजीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन घरी परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू केले असून, त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.


Comments
Add Comment

व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर जाण्याची शक्यता, ट्रम्प यांची भेट घेणार?

नवी दिल्ली: भारत आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी

आधार कार्ड हे नागरिकत्वाचा पुरावा नाही – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांवरील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर)

देशातील ६११५ रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा - अश्विनी वैष्णव

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे देशभरातील ६,११५ रेल्वे स्थानकांवर मोफत Wi-Fi सुविधा देत आहे. ही माहिती सरकारने आज,

'वोट चोरी' मोहिमेचा प्रचार व्हिडीओ काँग्रेसने माझ्या परवानगीशिवाय वापरला - के. के मेनन

मुंबई: काँग्रेस पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये 'स्पेशल ऑप्स' या

"खासदारांना मिळणार राजेशाही निवास! ७ BHK, मॉड्युलर किचनसह सर्व सोयी"

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत दिल्लीच्या बाबा खडकसिंह मार्गावर नव्याने बांधलेल्या खासदारांच्या खास

Delhi Stray Dogs : दिल्लीतील रस्ते होणार ‘कुत्रेमुक्त’? सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने प्राणीप्रेमी संतप्त

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिलेल्या महत्त्वपूर्ण आदेशानुसार, दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी