पुण्यात बोर्ड काढण्यावरून वाद , तरुणावर कोयत्याने वार; काँग्रेसच्या माजी नेत्यावर गुन्हा दाखल

  26

पुणे : पुण्यात गुन्हेगारीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे . कधी खून, मारामाऱ्या, दरोडे, लुटमार , तर कधी कोयता गँग यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक गोपाळ तिवारी यांच्यासह पाच जणांवर विश्रामबाग पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. बोर्ड लावल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून हा प्रकार घडला असून, दोघांनी दिलेल्या तक्रारीनुसार परस्पर विरोधी गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत. नारायण पेठेतील केळकर रस्त्यावर तिवारी यांचे मुरलीधर व्हेज हे हॉटेल आहे. त्यापासून जवळच असलेल्या निघोजकर मंगल कार्यालयाजवळ हा प्रकार घडला .


स्वप्नील रामचंद्र मोरे (वय ३४,रा. नारायणपेठ) यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गोपाळ शंकर तिवारी (वय ६६, रा. घोलेरोड शिवाजीनगर), हर्ष उर्फ नन्नु शंकर शिर्के (वय २९, रा.नारायपेठ), निखील दिपील जगताप (वय ३३, रा.शनिवारपेठ), मुकूंद शंकर शिर्के (वय २७, रा.नारायणपेठ), अभिषेक उमेश थोरात (वय २२, रा.दत्तवाडी) यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. यातील हर्ष,निखील, मुकुंद आणि अभिषेक या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील मोरे याच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मुरलीधर हॉटेलच्या जवळील पुजा पेंटरच्या समोर सार्वजनिक रोडवर एक काळ्या रंगाचा बोर्ड लावला होता. तो काढण्यासाठी तिवारी आणि त्यांचे साथीदार तेथे आले. ते बोर्ड काढत होते त्यावेळी तिथे येऊन मोरे यांनी बोर्ड तो काढू नका, तो बेकायदेशीर असल्यास महापालिका काढून घेईल असे सांगितले. त्यावेळी हर्षने मोरे यांना तू कोण मला सांगणारा ? असे म्हणत झटापट करून छातीत बुक्के मारले. हा प्रकार घडल्यानंतर मोरे यांनी पोलिस चौकीत तक्रार दिली. पोलिसांनी वैद्यकीय तपासणीची यादी देऊन त्यांना ससून रुग्णालयात जाण्यास सांगितले होते. मात्र मोरे नंतर पोलिस चौकीत आले नाहीत असे वरिष्ठ निरीक्षक संतोष पांढरे यांनी सांगितले.


या घटनेनंतर मोरे हा मित्रासह केळकर रोडवर मित्रासोबत गप्पा मारत थांबला होता. त्या वेळी परत हर्ष, निखिल आणि त्याचे इतर साथीदार दुचाकीवरून तेथे आले. हर्षने त्याच्याकडील कोयत्याने मोरे याच्या बोटावर आणि पाठीवर वार केले, तर निखिलने लोखंडी रॉडने मारहाण केली. त्याच्या मित्रांनी आरडाओरडा करताच आरोपींनी तेथून पळ काढला. आरोपींच्या हल्ल्यात मोरे गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.


मुकूंद शंकर शिर्के (वय २७, रा.नारायणपेठ) याच्या तक्रारीनुसार, विश्रामबाग पोलिसांनी स्वप्निल उर्फ बाबा मोरे आणि त्याच्या पाच ते सात साथीदारांविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Comments
Add Comment

काम करा, अन्यथा फेरबदल होणार : शिंदेंचा मंत्र्यांना इशारा

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या

वाळत घातलेले कपडे काढताना लागला विजेचा धक्का, महिलेचा दुर्देवी मृत्यू

जळगाव : वाळत घातलेले कपडे काढत असताना विजेचा धक्का लागल्याने ७१ वर्षीय महिलेचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना

प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये महिलांचे नग्न फोटो, महिला आयोगाचा धक्कादायक खुलासा

पुणे : पुणे पोलिसांनी एका रेव्ह पार्टीवर छापा टाकून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते एकनाथ खडसे

अवयवदानात महाराष्ट्र देशात अव्वल!

मुंबई : अवयवदानाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर असून, गेल्या वर्षी राज्यात १९८ ब्रेन-डेड दात्यांची नोंदणी

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मिळणार जुलैचा हप्ता

मुंबई : राज्यातील लाडक्या बहि‍णींना सरकारकडून मिळणाऱ्या हफ्त्याची वाट पाहावी लागत असून १५०० रुपये बँक खात्यात

नागपूर - पुणे वंदे भारत या दिवसापासून धावणार

नागपूर : नागपूर (अजनी) ते पुणे आणि पुणे ते नागपूर (अजनी) अशी वंदे भारत एक्सप्रेस रविवार १० ऑगस्ट २०२५ पासून धावणार