आमदार निलेश राणे यांच्यावतीने गणेशभक्तांसाठी 'शिवसेना एक्सप्रेस' मोफत विशेष ट्रेन

गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी सातत्यपूर्ण उपक्रम : २५ ऑगस्ट रोजी दादर ते कुडाळ असा असणार प्रवास


मालवण (प्रतिनिधी): दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमदार निलेश राणे यांच्यावतीने गणेशोत्सवानिमित्ताने गणेशभक्तांसाठी मोफत विशेष ट्रेन २५ ऑगस्ट रोजी दादर ते कुडाळ अशी सोडण्यात येणार आहे. "शिवसेना एक्स्प्रेस" या विशेष ट्रेनची घोषणा आमदार निलेश राणे यांच्यावतीने करण्यात आली आहे.


गणेश  भक्तांना आनंदात, उत्साहात आपल्या गावी कुटुंबासोबत गणेशोत्सव साजरा करता यावा. यासाठी दर वर्षी आमचा हा छोटासा प्रयत्न असतो, असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.


२५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. दादर येथून सुटणाऱ्या या शिवसेना एक्स्प्रेसमधून दादर ते कुडाळ असा प्रवास गणेश भक्तांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही रेल्वे दादर ते कुडाळ अशी धावणार आहे. मुंबईमधून आपल्या गावी गणेशोत्सवासाठी जाण्यासाठी दादर ते कुडाळ स्थानकापर्यंत ही विशेष ट्रेन असणार आहे.


ट्रेनमध्ये विनामूल्य तिकीट बुकिंगसाठी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मोबाईल नंबर ८६५२४८९९६४, ८६५२२७२०३१ यांच्याशी संपर्क साधावा. बुकिंगसाठी आपले आधारकार्ड / मतदार ओळखपत्र यापैकी एक आवश्यक आहे. बुकिंग अहस्तातरणीय असणार आहे.


गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांनी लवकरात लवकर आपली सीट बुक करावी आणि आपल्या गावी उत्साहाने गणेशोत्सव साजरा करावा. मोफत नाव नोंदणी करून या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार निलेश राणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

MPSC 2026 चे वेळापत्रक जाहीर, सविस्तर वाचा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, गुंदवलीवरून थेट गाठता येणार मिरा रोड

मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या गुंदवलीवरून निघालेली मेट्रो दहिसर पूर्व

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या