Tata Shares: टाटा कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांचे कोट्यावधीचे वाटोळे 'या' दोन शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण

मोहित सोमण: गुंतवणूकदारांना केवळ टीसीएसने केलेली १२००० कर्मचाऱ्यांची नाही तर स्वतः ची गुंतवणूक घालवल्याची चिंता अधिक असल्याचे दिसून आले आहे. टाटा कंपनीच्या शेअर्समध्ये संपूर्ण एक वर्षाचा कालखंड पकडला असता मोठी घसरण झाली. गुंतवणूकदारांचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. कंपनीच्या श्रेणीत विचार केला असता निफ्टीत ट्रेंट (Trent) व टीसीएस (Tata Consultancy Services TCS) कंपनीच्या शेअर्समध्ये थोडीथोडकी नाही तर २५% घसरण झाली आहे. मागच्या वर्षी ट्रेंटने ८०० % परतावा (Returns) दिला असला तरी निफ्टी ५० चा विचार केल्यास कंपनीच्या शेअर्स (Stocks) ३०% घसरण झाली आहे. टीसीएस देखील घसरण्यात मागे नाही. टीसीएसच्या शेअर्समध्ये २५% घसरण केली आहे.


एकेकाळी गुंतवणूकदारांची संपत्ती दर पाच वर्षांनी दुप्पट करण्याची क्षमता असलेला खरेदी-विक्री स्टॉक मानला जाणारा टीसीएस शेअर आता २००८ च्या जागतिक आर्थिक संकटानंतरचा सर्वात वाईट टप्प्यात पोहोचला आहे. जेव्हा एका वर्षात शेअरची किंमत ५ ५% घसरली होती.गेल्या पाच वर्षांत ८००% परतावा दिल्यानंतर ट्रेंट देखील २००८ नंतरचा सर्वात वाईट टप्पात पोहोचली आहे. टीसीएसची आकडेवारी संतुलित आली असूनही आयटी क्षेत्रीय प्रभावापेक्षा कंपनीच्या अंतर्गत प्रश्नांमुळे ही घसरण झाल्याचे विश्लेषक सांगतात. ट्रेंट शेअर बाबतीत कंपनीच्या संतुलित वाढीत घसरण झाल्याने तज्ञांनी खराब रेटिंग दिल्याने कंपनीकडे गुंतवणूकदारांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र निर्माण झाले आहे.कालच्या सत्रातील मूल्यांकनाचा विचार केल्यास टाटा केमिकल्सनेही चांगले प्रदर्शन केले होते. महत्वाच्या घडामोडींचा विचार केल्यास नुकत्याच टेलिकॉम विभागाने (Department of Telecom DoT) टाटा कम्युनिकेशनला ८७२७ कोटींसाठी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. स्थूल अँडजेसटेड महसूल (Gross Adjusted Revenue) संबंधित ही नोटीस २००६ ते २०२४ पर्यंत कालखंडातील कंपनीच्या ताळेबंद हिशोबासंबंधात होती. टीसीएसने परवा १२००० हून अधिक कर्मचाऱ्यांची कपात केल्याने केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आम्ही या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत असे सुतोवाच केले होते.


घसरत असलेल्या टीसीएस शेअर्समध्ये तांत्रिक दृष्टिकोनातून, ६८२.३० रुपयांवर सध्या व्यवहार करत असले तरी त्यांच्या आठ प्रमुख साध्या चालत्या सरासरी एसएमए(Simple Moving Average SMA) सातपेक्षा कमी दर्शविला जात आहे. तर ट्रेंट या टाटा समु हाच्या कंपनीचे एसएमए ७ पेक्षा कमी दर्शविला जात आहे. दोन्ही कंपनीच्या बाबतीत कमाईत घसरण सुरू असली तरी टीसीएससाठी विश्लेषकांनी आशावाद बाळगला आहे. मोतीलाल ओसवालने ३८५० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमतीवर बाय कॉल (Buy Call) दिला असून नुवामाने ३९५० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमतीवर (Target Price TP) बाय कॉल दिला आहे.


विशेषतः जेएम फायनांशियलने जेएम फायनान्शियलने कंपनीच्या शेअर्सबाबत आशावादी असल्याचे आहे, त्यांना अशी अपेक्षा आहे की एकदा आर्थिक अनिश्चितता कमी झाली की टीसीएसची वाढ सुधारेल. टीसीएस व्यवस्थापनाने पुन्हा एकदा सांगितले आहे की आर्थिक वर्ष २६ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील महसूल वाढ आर्थिक वर्ष २५ पेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे आणि जर अधिक विलंब न करता मॅक्रो परिस्थिती स्थिर झाली तर तिमाही २ पहिल्या तिमाहीपेक्षा अधिक मजबूत असू शकते. आज सकाळच्या स त्रात टीसीएस शेअर दुपारपर्यंत १.११% घसरला आहे. तर ट्रेंट शेअर दुपारपर्यंत ०.४०% वाढला होता. सकाळी बाजार उघडल्यावर टीसीएस शेअर ३०६० रूपयांवर सुरू झाला होता तर ट्रेंट शेअर सकाळी उघडल्यावर ४९९४ रुपयांवर सुरू झाला होता.

Comments
Add Comment

आरबीआयकडून जपानच्या दिग्गज सुमिटोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशनला भारतात बँकिंग व्यवसायासाठी मान्यता

मोहित सोमण: आरबीआयने सुमिटोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन (SMBC) या जापनीज कंपनीला भारतात बँकिग व्यवसायासाठी आपली

Tejasvee Ghosalkar : मतदानाच्या दिवशी तेजस्वी घोसाळकर भावूक! आज शारीरिकदृष्ट्या अभिषेक सोबत नसले, तरी...

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत असताना, दहिसरमधील वॉर्ड क्रमांक २ मध्ये एक अत्यंत

Maharashtra Election 2026 Voting : आज दारू मिळणार? बँका सुरु आहेत का? आज काय काय सुरु आहे? वाचा संपूर्ण यादी

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी

आज शेअर बाजार व कमोडिटी बाजार सुरु राहणार का? 'ही' आहे माहिती

प्रतिनिधी: आज दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी शेअर बाजार बंद

BMC Elections : ही सुट्टी म्हणून घरात बसून राहू नका...; नाना पाटेकरांचे मतदारांना कळकळीचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्र आज एका मोठ्या राजकीय वळणावर उभा आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या २,८६९ जागांसाठी आज मतदान

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.