निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील सकाळच्या सत्रातील संमिश्र कौलाने अखेरच्या सत्रात बाजी पलटली ज्यामुळे अखेरच्या सत्रात सगळयाच समभागात वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (१.१८%), मिडस्मॉल हेल्थकेअर (१.३४%), हेल्थकेअर (१.२६%), फायनांशियल सर्व्हिसेस एक्स बँक (०.६०%), मेटल (१.००%), मिडिया (०.८२%), फार्मा (१.३७%) समभागात झाली. आयटीत मात्र केवळ ०.०१% वाढ झाली. आज शेअर बाजारात अस्थिरतेचे लोण सकाळीही कायम होते मात्र त्यानंतर मजबूत फंडामें टलसह आजच्या काही तिमाही निकाल व प्रस्तावित तिमाही निकालात चांगली कामगिरी अपेक्षित असल्याने शेअर बाजार उसळले आहे. तरीही जागतिक पातळीवरील अस्थिरता, आगामी ट्रम्प यांचा टेरिफ वाढीतील आगामी निर्णय या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारां नी आखडते हात घेतल्याने आणखी वाढ बाजारात झाली नाही. मात्र आजच्या रॅलीनंतर गुंतवणूकदारांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
जगभरातील युक्रेन रशिया युद्ध सुरू असल्याने रशियावर युरोपियन युनियन व युएस दबाव टाकत असल्याने कच्च्या तेलाच्या निर्देशांकात अस्थिरता निर्माण झाली आहे. संध्याकाळपर्यंत सोन्याच्या WTI Futures निर्देशांकात ०.१२% वाढ झाली आहे. Brent Fut ures निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.४८% वाढले आहे. सोन्याच्या दरातही सातत्याने वाढ होत असताना आज अखेरीस पातळी घसरल्याने सोने स्वस्त झाले. प्रामुख्याने घटलेली मागणी, ईपीएफसह देशांतर्गत घसरलेली मागणी अशा कारणांमुळे सोन्यात घसरण झाली. याशिवाय आज डॉलरच्या तुलनेत रूपयात घसरण झाली आहे. यामुळे आज रूपयाचे मूल्य चार महिन्यातील निचांकी आकड्यावर (All time Low) गेले आहे. सकाळी आणखी रुपयांच्या निर्देशांकात आणखी ०.२% घसरण झाल्याने रुपयाने ही पातळी गाठली.
आज बीएसईत ४१५७ समभागांपैकी २४८२ समभागात वाढ झाली असून १५२१ समभागात घसरण झाली. एनएसईत ३०५० समभागांपैकी १९३४ समभागात वाढ झाली असून १०२५ समभागात घसरण झाली आहे. विशेषतः एनएसईत ७७ शेअर अप्पर सर्किटवर कायम असून ७१ शेअर लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स (०.१५%), एस अँड पी ५०० (०.०२%), नासडाक (०.३३%) तिन्ही बाजारात वाढ झाली आहे. काल तिन्ही युरोपियन शेअर बाजारात घसरण झाली होती ते युएसशी झालेल्या डीलनंतर आज पुन्हा वाढले आहेत. तिन्ही एफटीएसई (०.७३%), एफटीएसई (१.५४%), डीएएक्स (१.४३%) बाजारातील सुरूवातीच्या सत्रात वाढ झाली. आशियाई बाजारातील परिस्थिती टेरिफ अनिश्चिततेमुळे आजही संमिश्रच राहिली आहे. हेंगसेंग (०.३३,%), तैवान वेटेड (०.९१%), स्ट्रेट टाईम्स (०.२८%), निकेयी २२५ (०.९२%) बाजारात घसरण झाली आहे. तर कोसपी (०.६५%),सेट कंपोझिट (१.३४%),जका र्ता कंपोझिट (०.०४%), शांघाई कंपोझिट (०.३३%) बाजारात वाढ झाली.
अखेरच्या सत्रात आज सर्वाधिक वाढ अपार इंडस्ट्रीज (११.७३%), नेटवेब टेक्नॉलॉजी (७.९५%), वेलस्पून (७.१३%),टाटा केमिकल्स (७.०३%),मोतीलाल ओसवाल फायनान्स (६.१५%),वरूण बेवरेज (५.२२%),जेपी पॉवर वेचंर (५.००%), गो डिजिट जनरल (४. ८८%), अदानी पॉवर (३.८४%), विशाल मेगामार्ट (२.९३%), रिलायन्स इंडस्ट्रीज (२.१३%), लोढा डेव्हलपर (३.६०%),एल अँड टी (२.१४%),भारती एअरटेल (१.४८%), एचडीएफसी बँक (०.७२%) समभागात झाली आहे. अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण झेन टेक्नॉलॉजी (५.००%), होम फर्स्ट फायनान्स (४.९१%), एसबीएफसी फायनान्स (४.२४%),आयईएक्स (३.२१%), एसईएमई सोलार होल्डिंग्स (२.६१%), माझगाव डॉक (२.४९%), एनटीपीसी ग्रीन (१.२२%), श्री सिमेंट (०.९३%), एसबीआय लाईफ इन्शुरन्स (०.९२%), एक्सिस बँक (०.८८%),चोलामंडलम फायनान्स (०.३७%), गोदरेज कंज्यूमर प्रोडक्ट (०.३६%), बजाज फिनसर्व्ह (०.२६%), इटर्नल (०.२४%), इन्फोसिस (०.१५%) समभागात झाली.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले की,'अमेरिकेन सरकारच्या टेरिफमुळेच आता जग सावध झाले आहे.आणि जपानच्या होंडा व टोयोटाने अमेरिकेतून डझनभर पेक्षा जास्त मॅन्युफॅक्चरिंग युनिट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी ५५००० पेक्षा जास्त अमेरिकेत लोकांच्या नोकरीच्या संधी जाणार हे निश्चित.या मागे अमेरिकेत धोरणात झालेला बदल,ऑटोमोबाईल सुटे भाग बनविणाऱ्या देशांवर टेरिफ लादणे,लेबर लाॅमधील बदल व मुख्यतः टेरिफ हळूहळू हाच प्रकार इतर सेक्टरमध्ये येणारच आहे. टीसीएसने पुढील वर्षाच्या बिझनेसबद्दल कोणतीही शाश्वती दिली नाही व १२००० जणांच्या नोकऱ्या कमी करणार असल्याचे जाहीर केले आहे.
मागील तिमाहीचे निकाल पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येते की या सर्व वरील गोष्टींवर याचा परिणाम नक्कीच होणार आहे.बजाज फायनान्स यासारख्या कंपन्यांचे निकाल पहाता मंदी सदृश्य परिस्थिती आपण नक्कीच अनुभवणार असं वाटू शकतं.एकतर आपले निर्देशांक हे बँका,फायनान्स व रिलाय न्स चे वर्चस्व असलेला आहे. याचा परिणाम म्हणून मागील तीन दिवसात बाजार पडत आहे. विदेशी गुंतवणूकदारांकडून अशा परिस्थितीत विक्री न झाल्यास नवल.मागील तीन दिवसात १०००० करोड रूपयांची विक्री विदेशी गुंतवणूकदारांकडून झाली आहे व ते आपल्यालाही मंदीचा सिग्नल देत आहेत का अशी शंका येत आहे. टेरिफमुळेच जगाला मंदी सारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल का अशी शंका येत आहे. सॉफ्टवेअर,ऑटो स्पेयर पार्ट फूड अशा कोणकोणत्या क्षेत्राला याचा फटका बसणार आहे? अशा परिस्थितीत फायनान्शियल क्षेत्र कसं ठीकठाक राहणार हा खरा प्रश्न आहे ज्यावर आपले सर्व निर्देशांक अबलंबून आहेत मग शेअर बाजारात तेजी दिसेल कशी ? टेरिफ चे परीणाम खास भारतासारख्या देशांसाठीचा ट्रॅप असेल तर आपण खरचं अडकत आहोत का हे पुढील कालात स्पष्ट होईल..तोपर्यंत दिशाहिन बाजार!'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना चॉईस इक्विटी ब्रोकिंग रिसर्चचे वरिष्ठ तांत्रिक व डेरिएटिव विश्लेषक मंदार भोजने म्हणाले की,' लार्ज-कॅप शेअर्समधील निवडक खरेदीमुळे सुरुवातीच्या तोट्यातून सावरल्यानंतर २९ जुलै २०२५ रोजी भारतीय शेअर बाजारांनी वधार मिळवला. निफ्टी ५० १४०.२० अंकांनी (०.५७%) वाढून २४८२१.१० पातळीवर बंद झाला, तर सेन्सेक्स ४४७.६३ अंकांनी (०.५५%) वाढून ८१८३८.५४ पातळीवर स्थिरावला. सत्राच्या उत्तरार्धात बाजारातील व्यापक भावना सु धारल्या, पुढे जाणाऱ्या शेअर्सनी घसरणीला मागे टाकले. क्षेत्रीय कामगिरी करणाऱ्यांमध्ये, एफएमसीजी, ऑटो आणि एनर्जी स्टॉक्सने ताकद दाखवली, तर आयटी आणि मेटल स्टॉक्स दबावाखाली राहिले.
तांत्रिक आघाडीवर, निफ्टीने त्याच्या १०० दिवसांच्या ईएमएवर (Exponential Moving Average EMA) आधार घेतला आहे आणि २४८०० पातळीच्या वर बंद झाला आहे. मजबूत व्हॉल्यूमसह तेजीची मेणबत्तीची (Bullish Candle) निर्मिती कमी पातळीवर खरेदीची आवड दर्शवते. जर निर्देशांक २४८०० पातळीच्या वर टिकला, तर आपण २५००० आणि २५२०० पातळीच्या दिशेने आणखी एक रॅली पाहू शकतो. जवळच्या काळात. नकारात्मक बाजूने, २४६०० पातळी हा तात्काळ आधार (Immediate Support) आहे; यापेक्षा कमी झाल्यास २४२००-२४१६० पातळीपर्यंत आणखी सुधारणा होऊ शकते. एकूणच कल तेजीचा आहे आणि घसरणीवर खरेदी करण्याची शिफारस केली जाते. बँक निफ्टीने एका अरुंद श्रेणीतून खाली आल्यानंतर, त्याच्या ब्रेकडाउन पातळीची पुन्हा चाचणी केली आणि आता तो एका प्रमुख झोनभोवती फिरत आहे. जर तो ५६२७५ पातळीच्या वर राहिला तर तो ५७००० आणि ५७६३० पातळीपर्यंत वाढ वाढवू शकतो. उलट, आधार ५५५००-५५१५० पातळीवर आहे. आरएसआय (Relative Strength Index RSI) ४४.९३ वर आहे आणि वरच्या दिशेने ट्रेंड करत आहे, जो सुधारित गती दर्शवितो. व्यापक रचना तेजीचा पक्षपात दर्शवते आणि बँक निफ्टीमधील कोणतीही घसरण खरेदीची संधी म्हणून वापरली जाऊ शकते.
डेरिव्हेटिव्ह्ज विभागात, इंडिया VIX ४.४६% ने घसरून ११.५२५० वर आला, जो कमी अस्थिरता आणि सुधारित व्यापारी आत्मविश्वास दर्शवितो. पर्यायांच्या आघाडीवर, निफ्टीसाठी सर्वोच्च कॉल ओपन इंटरेस्ट दिसून येतो. २५००० आणि २५२०० स्ट्राइक किमती संभाव्य प्रतिकार दर्शवितात. पुट बाजूला, सर्वोच्च ओपन इंटरेस्ट २४८०० स्ट्राइकवर केंद्रित आहे, जो मजबूत समर्थन दर्शवितो. एकत्रितपणे, तांत्रिक सेटअप आणि डेरिव्हेटिव्ह डेटा जोपर्यंत प्रमुख समर्थन पातळी राखली जातात तोपर्यंत संभाव्य वाढीचे संकेत देतात.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की,' अमेरिका-भारत व्यापार वाटाघाटींमुळे सुरू असलेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, देशांतर्गत शेअर बाजाराने दिवसा च्या नीचांकी पातळीपासून थोडीशी सुधारणा केली. जवळजवळ सर्व क्षेत्रे हिरव्या रंगात बंद झाली, ज्यामध्ये धातू, औषध आणि रिअल्टी आघाडीवर होती, तर आयटी, वित्तीय आणि एफएमसीजी कमकुवत तिमाही निकालांमुळे मागे पडले. अमेरिकन फेडकडून धोरणात्मक निर्णय आणि १ ऑगस्टची परस्पर टेरिफ अंतिम मुदत यासारख्या महत्त्वाच्या जागतिक घटनांपूर्वी गुंतवणूकदारांची भावना सावध राहिली आहे. पहिल्या तिमाहीचे निकाल आणि या आठवड्याच्या मासिक समाप्तीसह वरील तपशीलांवर लक्ष ठेवून नजी कच्या काळात या तेजीचे टिकाव सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. निफ्टी ५० निर्देशांकासाठी २५००० ते २५१०० हे वरच्या टोकावर निर्बंध म्हणून काम करण्याची शक्यता आहे.'
आजच्या बाजारातील निफ्टीवर विश्लेषण करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तंत्रज्ञान विश्लेषक रूपक डे म्हणाले की,' दैनिक चार्टवर निफ्टीने तेजीचा एक आकर्षक नमुना तयार केला, जो अर्थपूर्ण तेजीच्या उलट होण्याची शक्यता दर्शवितो. २-ता सांच्या चार्टवर,निर्देशांकाने सकारात्मक विचलनामुळे पुनर्प्राप्ती सुरू केली आहे. याव्यतिरिक्त, दैनिक चार्टवर एक छुपा सकारात्मक विचलन दिसून येत आहे, जो अल्पावधीत स्मार्ट पुनर्प्राप्तीची शक्यता दर्शवितो.वरच्या बाजूस निफ्टी २४९५०-२५००० पातळीच्या दिशेने जाऊ शकतो. २५००० पातळीच्या वर एक निर्णायक हालचाल २५२०० च्या दिशेने वाढू शकते. नकारात्मक बाजूस २४७५० पातळीवर आधार दिला जातो.'
आजच्या बाजारातील सोन्याच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,' सोन्याचे भाव ३५० रुपयांच्या वाढीसह ९७,९०० पातळीवर किंचित वाढले, तर कॉमेक्स सोन्याचे भाव ०.३०% वाढून ३३२५ डॉलरवर पोहोचले. या आठवड्यात फेडच्या दर निर्णयासोबतच प्रमुख अमेरिकन आर्थिक डेटा - एडीपी नॉन-फार्म एम्प्लॉयमेंट चेंज, नॉन-फार्म पेरोल्स, बेरोजगारी दर आणि जीडीपी - रांगेत असल्याने, किंमत कारवाई अस्थिर राहण्याची अपेक्षा आ हे. नजीकच्या काळात सोने ९७०००- ९८६५० पातळीच्या मर्यादेत जाण्याची शक्यता आहे.'
आजच्या रूपयांच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,' डॉलर निर्देशांक ९९ च्या जवळ पोहोचल्याने, देशांतर्गत भांडवली बाजारातील वाढीवर पडदा पडला. १ ऑगस्ट रोजी अमेरि केच्या व्यापार कराराची अंतिम मुदत जवळ येत असल्याने आणि अमेरिकेतील प्रमुख डेटा - एडीपी बिगर-शेती रोजगार, बिगर-शेती वेतन, बेरोजगारी दर, जीडीपी आणि फेडरल रिझर्व्हचे धोरण विधान - या आठवड्यात रांगेत असल्याने, परकीय चलन बाजार अ त्यंत अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे. रुपया ८६.४५-८७.२५ पातळीच्या विस्तृत श्रेणीत व्यापार करण्याची शक्यता आहे.'
यामुळेच आगामी निकालांच्या पार्श्वभूमीवर बाजारात रॅली होईल की नाही हे विशेष ट्रिगर नसला तरी जागतिक टेरिफ, क्षेत्रीय विशेष कामगिरी, तिमाही निकालावर अवलंबून असेल.