विरार: वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी कारवाई केली. वसई-विरार परिसरातील अनधिकृत बांधकामप्रकरणी दाखल गुन्ह्यानंतर ईडीने पहाटेपासून पवार यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. ही छापेमारी मुंबई, नाशिक आणि वसई-विरार या तीन ठिकाणी करण्यात आली. विशेष म्हणजे, बहुसंख्य ठिकाणे पवार यांच्याशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.
काँग्रेसने इतिहासात केलेल्या चुकांमुळेच आज दहशतवादाची समस्या उग्र झाली नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत ‘ऑपरेशन सिंदूर’वरील ...
छाप्यांची मोहीम अत्यंत गोपनीयपणे राबवण्यात आली असून ती संपूर्ण दिवसभर सुरू होती. माजी नगरसेवक धनंजय गावडे यांनी या संदर्भात तक्रारी दाखल केल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
विशेष म्हणजे, सोमवारी अनिलकुमार पवार यांचा वसई-विरार महापालिकेमधून निरोप समारंभ पार पडला होता. आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळीच ईडीने त्यांच्या घरी आणि इतर ठिकाणी छापे टाकल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
सध्या पवार यांची बदली ठाण्यातील एसआरए (स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी) विभागात करण्यात आली आहे.