राज्यात ६ महिन्यांत प्राणघातक अपघातांची संख्या वाढली! राज्य वाहतूक विभागाने दिली माहिती

  70

मुंबई : महाराष्ट्रात विविध सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करूनही अनेक अपघात घडून येतात. किंबहुना दरदिवशी या संदर्भात काही न काही घटना घडतात. त्यामुळे रस्ते अपघातात महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा लागतो. याच पार्श्वभूमीवर, राज्य वाहतूक विभागाने जारी केलेल्या आकडेवारीत एक मोठी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, यावर्षी जानेवारी ते जून या कालावधीत रस्त्यांवरील प्राणघातक अपघातांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत २१ ने वाढली आहे. एकूण अपघात आणि अपघाती मृत्यूंमध्ये मात्र किरकोळ घट नोंदवण्यात आली आहे.


राज्य वाहतूक विभागाने जारी केलेल्या आकडेवारीत चार कोटींहून अधिक नोंदणीकृत वाहने असल्याचे सांगण्यात आलं आहे. ज्यात रस्त्यांवर दरवर्षी ३५ हजारांहून अधिक अपघात होत असून, त्यांत १५ हजारांपेक्षा जास्त मृत्यूंची नोंद होते. रस्ते आणि महामार्ग वाढल्याने रस्तेसुरक्षेच्या दृष्टीने आव्हान निर्माण झाले आहे.


परिवहन विभाग, वाहतूक पोलिसही फारसे गंभीर नसल्याने ८० टक्क्यांपेक्षा जास्त वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात आणि त्यामुळे रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे बोलले जात आहे.



अपघातांची कारणे


भारतातील ४० टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या मोठ्या शहरांमध्ये राहते. त्यामुळे शहरी रस्ते अधिक सुरक्षित असणे गरजेचे आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात जास्त अपघात होत आहेत. वेगाने वाहन चालवणे, चालकांकडून उत्तेजक पदार्थांचे सेवन, हेल्मेटचा वापर न करणे, सीटबेल्ट न लावणे, वाहन चालवताना मोबाइल फोन वापरणे, असुरक्षित रस्ते, पायाभूत सुविधांचा अभाव, अपघातानंतरची अपुरी काळजी आणि वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष अशी रस्ते अपघातांची प्रमुख कारणे आहेत. इतर कारणांमध्ये रस्ते अभियांत्रिकीतील कमतरता, खड्डे, जुनी वाहने आणि ओव्हरलोडिंग यांचा समावेश होतो. तथापि, शहरी किवा निमशहरी रस्त्यांवर उलट दिशेने वाहन चालवणे हे अपघातांचे दुसरे सर्वांत मोठे कारण आहे.


राज्यातील रस्ते अपघात २०२० ची आकडेवारी पाहिल्यास एकूण १०,७३३ रस्ते अपघात झाले. ज्यात ११,५६९ मृत्यू तर १३,९७१ जखमी झाल्याची नोंद आहे. त्यांनतर २०२१ मध्ये ११,२५५ अपघात झाले यात १३,५२८ मृत्यू तर १६,०७३ जखमी झाले. अपघातांची आणि मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या वर्षानुवर्षे वाढत जात असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे. हा आकडा २०२४ ला आणखीनच वाढला. २०२४ च्या रस्ते अपघात आकडेवारीनुसार १४,५६५ अपघात झाले असून १५,७१५ जण मृत्यू तर २२,०५१ जखमी झाल्याची नोंद आहे.



जानेवारी-जूनदरम्यानच्या अपघाताची आकडेवारी


वर्ष २०२४ च्या तुलनेत अपघाताचे प्रमाण यावर्षी वाढले आहे, गेल्यावर्षी सहा महिन्यात ७,६७४ अपघात झाले होते. तर यावर्षी हि संख्या ७,६९५ इतकी वाढली आहे. ज्यात आतापर्यंत ८,२७६ मृत्यू तर गंभीर जखमी १२,०६८ अशी आकडेवारी समोर आली आहे.


Comments
Add Comment

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने