महाराष्ट्र भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीर; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची घोषणा

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपताच महाराष्ट्र भाजपने संघटनात्मक फेरबदल केले आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी नवी प्रदेश कार्यकारणी जाहीर केली असून, १२ उपाध्यक्षांसह ४३ जणांची कोअर टीम तयार केली आहे. विशेष म्हणजे मुंबई पालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवक नवनाथ बन यांच्याकडे महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्तेपद देण्यात आले आहे.


चव्हाण यांनी १२ जणांच्या खांद्यावर प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. या उपाध्यक्षांकडे विभागनिहाय जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार, अतुल काळसेकर कोकण, भारती पवार उत्तर महाराष्ट्र, संजय कौडगे मराठवाडा, संजय भेंडे विदर्भ, रामदास तडस विदर्भ, केशव उपाध्ये मुंबई, प्रवीण पोटे विदर्भ, गोपीचंद पडळकर पश्चिम महाराष्ट्र, चैतन्य देशमुख मराठवाडा, प्रिया शिंदे पश्चिम महाराष्ट्र, सुजय विखे पाटील उत्तर महाराष्ट्र आणि अर्चना पाटील चाकूरकर यांच्याकडे मराठवाडा विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.


त्याशिवाय आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे, सुनील राणे यांच्याकडे सरचिटणीस पदाची धुरा देण्यात आली आहे. त्यांच्याकडे अनुक्रमे कोकण, मुंबई, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई विभागाची जबाबदारी असेल. या व्यतिरिक्त १२ सरचिटणीस नेमण्यात आले आहे. आमदार मिहीर कोटेचा यांच्याकडे मुंबईचे कोषाध्यक्ष पद देण्यात आले आहे. विविध सेलचे अध्यक्षही नेमण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

MPSC कडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; उमेदवारांना मोठा दिलासा

अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी मिळाली नवी मुदत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या;सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;पुणे, शिरूर,

Shetkari Karjmafi update : कर्जमाफी योजनेत १ लाख ४० हजार शेतकरी अपात्र; प्राप्तिकर आणि अन्य कारणांनी वगळल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

१६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत निधी जमा होणार मुंबई : राज्य सरकारने घोषित केलेल्या 'पुण्यश्लोक

Tuljabhavani Temple Land Case : तुळजाभवानीच्या १,६६८ हेक्टर जमिनींच्या कथित घोटाळ्यावर समिती आक्रमक; 'तातडीने ताबा घ्या, नाहीतर कोर्टात भेटू!'

पुणे : श्री तुळजाभवानी देवस्थानच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील

Devendra Fadnavis : गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुंबई

Road Accident : घाटात मोठा अपघात, ब्रेक फेल झाला आणि ट्रकने SUV चिरडली; तीन वाहनांचे प्रचंड नुकसान

गडचिरोली : कोरची - कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर बेडगाव घाटात बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) सकाळी साडेअकराच्या सुमारास