Beed: दहावीच्या मुलीचं अपहरण करत...; पीकअप चालकाच्या कृत्याने परिसरात तीव्र संताप

बीड: गेल्या काही काळात बीड जिल्हा गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत आहे. आता केज तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. दहावीत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केले आहेत. मुलगी अचानक बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.


तक्रारीनुसार, समीर ताजोद्दीन शेख (वय २०, रा. सुर्डी-सोनेसांगावी) या तरुणाने शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास मुलीला फूस लावून नेले. संबंधित आरोपी हा पिकअप वाहन चालक म्हणून काम करतो. मुलगी घरी परतली नसल्याने तिच्या वडिलांनी युसूफवडगाव पोलिसांकडे धाव घेतली. तक्रार मिळताच पोलिसांनी विविध तांत्रिक साधनांचा वापर करून तपासाची दिशा ठरवली.


पोलिस उपनिरीक्षक भीमराव मांजरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. मोबाईल लोकेशनसह इतर पुराव्यांच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा शोधण्यात आला. रविवारी रात्री तो कळंब बस स्थानकावरून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई अत्यंत जलदगतीने पार पडल्याचे पोलिसांनी सांगितले.


आरोपीने चौकशीत मुलीला केजकडे जाणाऱ्या बसमध्ये बसविल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ हालचाल करत केज बस स्थानकातून मुलीला सुखरूप ताब्यात घेतले. पीडितेच्या जबाबानुसार, तिला गावाबाहेरील ज्वारीच्या शेतात नेऊन अत्याचार करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीविरुद्ध पोक्सो तसेच अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


दरम्यान, अटक करण्यात आलेल्या समीर शेख याला सोमवारी केज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने प्राथमिक सुनावणीनंतर आरोपीला २७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सुरू असून या प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी केली जात आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेबाबत अधिक खबरदारी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि