कोल्हापूरच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध: शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

कोल्हापुरात शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन


कोल्हापूर: शिवसेना पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शनिवारी झाले. या सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अशोक माने, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी आमदार जयश्री जाधव आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या दरम्यान त्यांनी कोल्हापूर वासियांना संबोधित करत, कोल्हापूरच्या सर्वांगिण विकासासाठी पक्ष नेहमी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.

कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाकडे शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बारीक लक्ष आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महायुती सरकारने कोल्हापूरच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी दिला. यापुढेही कोल्हापूरला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याची पूर्तता करु, असे आश्वासन श्रीकांत शिंदे यांनी दिले.



काय म्हणाले श्रीकांत शिंदे?


खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, कोल्हापूरकरांनी शिवसेनेला भरभरुन प्रेम केले. इथल्या मतदारांनी महायुतीच्या १० पैकी १० जागा निवडून दिल्या. यात शिवसेनेचे पाच आमदार निवडून आले. या मध्यवर्ती कार्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सोडवता येतील. जिल्ह्यात मध्यवर्ती कार्यालय असावे अशी बऱ्याच वर्षांपासून कार्यकर्त्यांची मागणी होती. आज मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून ती पूर्ण झाली, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.


एकनाथ शिंदे साहेबांनी अडीच वर्ष राज्याचे नेतृत्व करताना महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी यांच्यासाठी अनेक निर्णय घेतले. लाडकी बहिण योजना आणली. कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे निर्णय घेतले. अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून फिरणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा या महाराष्ट्राने पाहिला. या कामामुळेच सर्वसामान्यांचा विश्वास शिंदे साहेबांवर आणि शिवसेनेवर बसला, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.



काहीजण सकाळ संध्याकाळ टोमणे मारण्याचे, शिव्या देण्याचे काम करतात


जेष्ठ नागरिकांना एसटीमध्ये मोफत प्रवासाची सवलत योजना लागू केली. सुरुवातीला या योजनेची खिल्ली उडवली गेली, मात्र या योजनेचा लाखो ज्येष्ठांनी लाभ घेतला. याबाबत पन्हाळा ते पावनखिंड या मोहीमेदरम्यान आपल्याला अनुभव आल्याचे डॉ. शिंदे पुढे म्हणाले. या मोहीमेच्या वाटेवर एक ज्येष्ठ नागरिक वाट पाहत होते. ते मला भेटले आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांना धन्यवाद देण्याची भावना व्यक्त केली. तळागाळातील लोकांसाठी शिंदे साहेबांनी केलेल्या कामाचा आपल्याला अनुभव येतो, असे देखील ते पुढे म्हणाले. काहीजण सकाळ संध्याकाळ टोमणे मारण्याचे, शिव्या देण्याचे काम करतात, पण त्यांना मतदारांनी घरी बसवले असा टोला खासदार डॉ. शिंदे यांनी उबाठाला लगावला.



गाव तिथं शाखा, घर तिथं शिवसैनिक


जिल्ह्यात पाऊस असून देखील मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित आहेत. शिवसेना हा विचार आहे. तो पुढे घेऊन जात असताना तो ऊन वारा पाऊस कशाचीही तमा बाळगत नाही हे आज पुन्हा एकदा दिसून आले, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. गाव तिथं शाखा घर तिथं शिवसैनिक ही मोहीम सुरु आहे. त्यासाठी सदस्य नोंदणी सुरु करा. लोकसभा आणि विधानसभेप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वांनी एकजुटीने काम करायचे आहे. ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या पाठिशी उभ राहायचं आहे. जिल्ह्यात महायुतीचा भगवा नक्कीच फडकेल, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात