Kalyan: रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरणी गोकुळ झा ला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

कल्याण: रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रंजीत यांना शुक्रवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी ही दोघं दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत होती, जी शुक्रवारी संपली.


गोकुळ हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या तपासासाठी पोलिसांनी सात दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी विनंती केली होती. आडिवली-ढोकळी भागात बिल्डिंगमध्ये पाणी सोडण्याचे काम करणाऱ्या कामगारावर गोकुळ आणि त्याच्या काही साथीदारांनी धारदार हत्याराने हल्ला केल्याचा आरोप होता. या गुन्ह्यात गोकुळ फरार होता. त्यामुळे या प्रकरणात पाेलिसांनी त्याचा ताबा न्यायालयाकडून घेतला. गोकुळला शनिवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.



गोकुळची पत्रकारांना धमकी


गोकुळने बुधवारी न्यायालयात अरेरावी केली होती. शुक्रवारीही त्याची मुजोरी पाहायला मिळाली. त्याला मानपाडा पोलिस ठाण्यातून न्यायालयात नेताना त्याने बेड्या घालण्यास नकार दिला. तसेच, चेहऱ्यावर फडके गुंडाळण्यास मनाई करत पोलिसांशी देखील वाद घातला. त्यानंतर त्याने कोठडीतून बाहेर आल्यावर स्थानिक पत्रकारांना ‘तुम्ही चुकीचे केलेय, आपली लवकरच भेट होईल,’ अशी धमकीही दिली.

Comments
Add Comment

डोंबिवलीत मनसेला खिंडार!

दोन माजी नगरसेवक व नगरसेविका भाजपमध्ये डोंबिवली  : मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेतील

जलमापक सहा महिन्यांपासून बंद; पाणीपुरवठा खंडित होणार

नादुरुस्त जलमापक बदलण्यासाठी पालिकेची मोहीम भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेकडून शहरातील जलमापक जर सहा

प्रचार तोफा थंडावण्यापूर्वी मतदानाच्या तारखांमध्ये केला बदल, निवडणूक अधिकाऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण

ठाणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत.

बाल हक्क आयोगाचे कडोंमपा अधिकाऱ्यांवर चौकशीचे आदेश

ड्रेनेजमध्ये पडून बालक मृत्यूप्रकरण कल्याण  : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निष्काळजीपणामुळे डोंबिवली येथे

भिवंडीत विकासकाकडून १०० कोटींचा घोटाळा?

फसवणूक झालेल्या कुटुंबाचे आ. संजय केळकर यांना साकडे ठाणे  : भिवंडीजवळील खारबाव येथे सुरू असलेल्या इमारत

डोंबिवलीत सापडला महिलेचा मृतदेह; पती फरार

डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावरील कोळेगाव परिसरात बुधवारी सकाळी किरकोळ घरगुती वादातून पत्नीची गळा आवळून