मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या फेरबदलांची चर्चा आहे आणि यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं नावही जोमात घेतलं जातंय. याच पार्श्वभूमीवर नार्वेकरांनी दिलेलं विधान चर्चेचं केंद्रबिंदू ठरतंय. राज्यातील मंत्र्यांच्या वर्तनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्र पक्ष असणाऱ्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे म्हटले जात आहे. कारवाई केली नाही तर कोडगेपणा तयार होईल. तसेच काहीही केले तरी चालते, अशी भावना तयार होईल. यासाठी काही निर्णय घ्यावेच लागतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितल्याचा दावा राजकीय वर्तुळात वर्तवला जातोय. वादग्रस्त विधान करणारे नको, काम करणारे हवेत, यासाठी राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा मंत्रिमंडळातील समावेशाबाबत होत आहे, असेही म्हटले जात आहे. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली.
नवी दिल्ली : भारताने आंध्र प्रदेशमधील चाचणी तळावरुन ड्रोनद्वारे क्षेपणास्त्र चाचणी केली. ही चाचणी यशस्वी झाली. यामुळे संरक्षण साहित्य निर्मितीत ...
पक्षाची जी इच्छा असेल तिच माझी इच्छा
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही फेरबदलावर प्रतिक्रिया दिली. मीडियातील बातम्यांवर मी विशेष लक्ष देत नाही. कारण असा निर्णय माझ्या पक्षाचा आहे. मी अत्यंत संतुष्ट आहे. माझ्या पक्षाने जी जबाबदारी मला दिली आहे, त्यातूनच मी सामान्यातल्या सामान्य महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील व्यक्तीला न्याय देऊ शकलो. विधानसभा अध्यक्ष म्हणून कामकाजाचा दर्जा उंचावण्याची संधी मला मिळाली. १५२ लक्षवेधी एका अधिवेशनात मांडण्यात आल्या. कामकाज वाढले. मुंबई आणि नागपूर येथील विधानभवनाचा चेहरा मोहरा बदललेला आहे. इन्फ्रास्ट्रक्चर बदलले आहे. आम्ही पूर्ण डिजिटलाइज केलेले आहे. दोन्ही सभागृह आता पेपरलेस आम्ही करत आहोत. विधानसभा अध्यक्ष म्हणून मला चांगले काम करण्याची संधी मिळाली आहे. पक्षाची जी इच्छा असेल तिच माझी इच्छा असेल. अध्यक्षपद मंत्रिपदापेक्षा मोठं आहे. पद गेलं तर आनंद कसा होईल? तुमच्या आशीर्वादाने नवीन काही जबाबदारी मिळत असेल तर आनंदच होईल, असं राहुल नार्वेकर म्हणाले.