२३ ते २७ जुलैदरम्यान राज्यात मुसळधारेचा इशारा

मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात जोरदार पाऊस कोसळणार


मुंबई  : राज्यभरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. दोन दिवसांपासून मुंबई, ठाणे आणि कोकणात पावसाच्या सरी बरसत आहेत. कोकण किनारपट्टीसह पुणे, सांगली, सातारा व मराठवाड्यातीलही बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला आहे.


विदर्भातही जोरदार पाऊस बरसत आहे. अरबी समुद्रावर पावसासाठी वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय झाल्याने पुढील पाच दिवस कोकण किनारपट्टीसह विदर्भ व मराठवाड्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.


तळ कोकणासह मुंबई व उपनगरात, ठाणे आणि पालघरमध्येही पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेत हवामान विभागाने काही ठिकाणी ‘अलर्ट’ जारी केले आहेत. बंगालच्या उपसागरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे उपसागराच्या भागात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. अरबी समुद्रावरही जोरदार वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय झाले आहेत. त्यामुळे कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, पालघर, मध्य महाराष्ट्र व महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.



Comments
Add Comment

नवीन मोबाईल घेण्याचा विचार करताय का? तर हे तुमच्यासाठी आहेत चांगले ऑप्शन

ओप्पो १५ सप्टेंबरला भारतात नवीन F31 सिरीज स्मार्टफोन करणार लाँच

‘मिशन वात्सल्य योजने’चा सर्व विधवा व एकल महिलांना मिळणार लाभ - आदिती तटकरे

मुंबई : कोविड १९ या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना तसेच विधवा महिलांना

नेव्हल परिसरातील रायफल चोरी प्रकरणात ट्विस्ट; आरोपी आणि तक्रारदार एकमेकांना ओळखतात

मुंबई: मुंबई पोलीस गुन्हे शाखेने 'नेवी नगर रायफल चोरी' प्रकरणाच्या तपासात एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. आरोपी

तुमच्याकडे गाडी आहे का? तर हे जरूर वाचा...

सीएटने सर्व टायरच्या किमती केल्या कमी मुंबई : भारत सरकारने अ

महावितरण पहिल्या क्रमांकावर, केंद्राच्या क्रमवारीत १०० पैकी मिळाले ९३ गुण

मुंबई : केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या क्रमवारीत महावितरणने १०० पैकी ९३ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.

पंतप्रधानांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त, एसटीच्या ७५ बसस्थानकावर 'मोफत वाचनालय'

मुंबई: देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त एसटीच्या ७५ प्रमुख बस