Thane Water Supply: ठाण्यात 'या' दिवशी २४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद, जाणून घ्या कधी आणि कुठे?

पाईपलाईन दुरुस्तीच्या कामकाजामुळे मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार


ठाणे: ठाण्यातील काही भागात पाईपलाईन दुरुस्तीच्या कामकाजामुळे मंगळवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील शहाड येथील अशुद्ध जल उदंचन केंद्रावर मीटर बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. तसेच शहाड येथील अशुद्ध जल उदंचन केंद्र येथे होत असलेली पाईपलाईन गळती बंद करणे आणि इतर आवश्यक कामे महावितरण कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. या कामासाठी २४ तासांचा वॉटर शटडाऊन करण्यात येणार आहे. असल्यामुळे ठाणेकरांना ऐन पावसाळ्यातच मंगळवारी पाणी जपून वापरावे लागणार आहे.



पाण्याचे नियोजन करून ठेवण्याचे पालिकेकडून आवाहन


दुरुस्तीच्या कामामुळे ठाणे महापालिकेला मे.स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा मंगळवारी दिनांक २२/०७/२०२५ रोजी सकाळी ९.०० ते बुधवार दिनांक २३/०७/२०२५ रोजी सकाळी ९.00 वाजेपर्यत बंद राहणार आहे. त्यामुळे ठाणेकरांना पाण्याचे नियोजन करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



कोणत्या ठिकाणचा पाणीपुरवठा बंद केला जाईल?


या कामामुळे घोडबंदर रोड, पाटलीपाडा, बाळकुम, ब्रम्हांड, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, डोंगरीपाडा, वाघबीळ, इत्यादी ठिकाणाचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहील. तर समतानगर, ऋतुपार्क, सिध्देश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळव्याच्या व मुंब्राच्या काही भागात मंगळवारी रात्री ९ ते सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहील. अशा रितीने टप्याटप्प्याने एक वेळ पाणी पुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेलं आहे.

Comments
Add Comment

बदलापूर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

प्रवीण समजीस्कर मृत्यू प्रकरणातील तीन डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल  बदलापूर :  सह्याद्री सुपर सपेशालिस्ट

ठाण्यात ११ डिसेंबरपर्यंत दररोज ३० टक्के पाणीकपात

पाइपलाइन फुटल्याने पुरवठा विस्कळीत ठाणे : कळवा फाटा परिसरात महानगर गॅस कंपनीकडून सुरू असलेल्या कामादरम्यान

ठाणे घोडबंदर रोडवर आज वाहतूक कोंडीची शक्यता

दुरुस्तीच्या कामांमुळे जड वाहनांना प्रवेशबंदी ठाणे : ठाण्याचा घोडबंदर रोडवर उद्या (ता. ७) मोठ्या प्रमाणात वाहतूक

डोंबिवलीत १०७ तितर पक्ष्यांचा मृत्यू

डोंबिवली : डोंबिवली पूर्व येथील मोठगाव–ठाकुर्ली सातपुल परिसरात आज अचानक १०७ तितर पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत.

भिवंडी-निजामपूर पालिका आणि एमसीईडी यांच्यात सामंजस्य करार

भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर पालिका आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्यात शहरातील महिलांसाठी

भाईंदरमध्ये मराठी माणसाला घर देण्यास नकार !

बिल्डर लॉबीची अजब वागणूक भाईंदर : मराठी विरुद्ध अमराठी वादाचे भाईंदरमध्ये पडसाद उमटले आहेत. भाईंदरमध्ये एका