मुंबई: आचार्य चाणक्य यांना भारताचे सर्वात महान विद्वान आणि अर्थशास्त्री मानले जाते. चाणक्य यांचे अनेक विचार आजही जीवनात लोकांना मार्गदर्शन करत असतात.
चाणक्य नितीमध्ये अशा काही गोष्टी सांगित्या आहेत ज्या तुम्हाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जातात. तसेच अनेक समस्याही तुम्ही चुटकीसरशी दूर करू शकता.
चाणक्य नितीनुसार व्यक्तीने नेहमी समजून-उमजून बोलावे. चुकीच्या वेळेस बोललेले अनेक शब्द लोकांसाठी समस्या निर्माण करणारे ठरू शकतात.
आपल्या योजना, कमतरता तसेच पैशांची माहिती कोणलाही देऊ नये. आपल्या आर्थिक योजना नेहमी गुप्त राखल्या पाहिजेत.
चाणक्य नितीनुसार व्यक्तीचे सर्वात मोठे धन हे त्याचे ज्ञान असते. पैसे जरूर संपू शकतात मात्र ज्ञान कधीही संपत नाही. यामुळे नेहमी नवनवीन शिकण्याची सवय बनवा.
ज्यांच्याकडे ज्ञान असते त्यांना कधीही भौतिक सुखाची कमतरता भास नाही. ते शिकत शिकत पुढे जातात आणि मोठे यश मिळवतात.
राग, लोभीपणा आणि एखाद्या प्रगतीवर जळण्याची वृत्ती ही व्यक्तीला बर्बाद करण्यासाठी पुरेशी ठरते. याचे नियंत्रण मन आहे. मनावर नियंत्रण असेल तर सर्व काही शक्य आहे.
असे म्हणतात की जशी संगत तसाच माणूस घडतो. ज्यांची आपल्याला संगत लाभते आपण तसेच होत जातो. यामुळे चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. वाईट लोकांच्या संगतीत राहिल्याने नुकसानच होते.