बिहारमध्ये वीज मोफत होणार; निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमारांची घोषणा

पाटणा : विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारच्या जनतेला एक मोठी भेट दिली आहे. १ ऑगस्टपासून राज्यातील घरगुती ग्राहकांना १२५ युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाणार आहे. मुख्यमंत्री नितीश यांनी 'एक्स' वर लिहिले की, 'आम्ही सुरुवातीपासून सर्वांना स्वस्त दरात वीज पुरवत आहोत. आता आम्ही निर्णय घेतला आहे की, १ ऑगस्ट २०२५ पासून म्हणजेच जुलै महिन्याच्या बिलातून राज्यातील सर्व घरगुती ग्राहकांना १२५ युनिटपर्यंतच्या वीजेसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. याचा फायदा राज्यातील एकूण १ कोटी ६७ लाख कुटुंबांना होणार आहे.


पुढील तीन वर्षांत सर्व घरगुती ग्राहकांची संमती घेतल्यानंतर, त्यांना त्यांच्या घरांच्या छतावर किंवा जवळच्या सार्वजनिक ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प बसवून लाभ दिला जाईल. कुटीर ज्योती योजनेअंतर्गत, अत्यंत गरीब कुटुंबांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलेल. उर्वरितांसाठी सरकार योग्य मदत
देखील करणार आहे. यामुळे घरगुती ग्राहकांना आता १२५ युनिटपर्यंतच्या विजेवर काहीही खर्च करावा लागणार नाही. तसेच असा अंदाज वर्तवण्यात येतोय की, पुढील तीन वर्षांत राज्यात १० हजार मेगावॅटपर्यंत सौर ऊर्जा उपलब्ध होईल.


नितीश कुमार यांनी शिक्षण विभागात भरतीबद्दलही घोषणा केली होती. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लिहिले होते की, 'आम्ही शिक्षण विभागाला सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांची त्वरित गणना करण्यास आणि नियुक्त्यांसाठी लवकरच टीआरई4 परीक्षा घेण्यास सांगितले आहे. राज्य सरकारने आधीच स्पष्ट केले आहे की, नियुक्त्यांमध्ये महिलांसाठी 35 टक्के आरक्षणाचा लाभ फक्त बिहारमधील महिला रहिवाशांनाच मिळणार आहे.

Comments
Add Comment

निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी १२ पर्यायी ओळखपत्रे मंजूर

नवी दिल्ली  : देशभरातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचे निर्देश जारी केले

सावित्री जिंदाल देशातील सर्वात श्रीमंत महिला; फोर्ब्स इंडियाची यादी जाहीर

नवी दिल्ली : हरियाणा हिसारच्या आमदार आणि ओपी जिंदाल ग्रुपच्या प्रमुख सावित्री जिंदाल या फोर्ब्स इंडियाच्या २०२५

बिहारसाठी ‘एनडीए’चे जागावाटप

विधानसभेच्या २४३ जागांमध्ये १०१ जेडीयू , १०० भाजप , २९ लोजप (आर), ७ हिंदुस्तानी अवामी मोर्चा आणि ६ राष्ट्रीय लोक

कैद्यांना तुरुंगात मतदानाचा हक्क मिळणार?

केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस नवी दिल्ली : तुरुंगात असलेल्या विचाराधीन

फटाक्यांच्या मुद्द्यावर केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये

नवी दिल्ली : २० ऑक्टोबर रोजी भारत आणि जगभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर

पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेमुळे शेतकऱ्यांना विशेष फायदा

मंत्री नितेश राणे यांनी दिली माहिती मुंबई : पंतप्रधान धन धान्य कृषी योजना, राष्ट्रीय डाळी अभियान तसेच कृषी