Caredge Quick Commerce Research Report : क्विक कॉमर्स क्षेत्रात १४२% वाढ ! हे क्षेत्र तब्बल इतक्या कोटींवर पोहोचले!

  28

मोहित सोमण: 'आर्थिक वर्ष २०२५ मध्ये भारतीय क्विक कॉमर्स (Quick Commerce) उद्योग बाजार तब्बल ६४००० कोटींवर पोहोचले आहे ' असे केअर एज (Care Edge) संस्थेने आपल्या अहवालात नमूद केले आहे. आर्थिक वर्ष २०२२-२५ कालावधीत क्विक कॉमर्स क्षेत्रात १४२% वाढ झाल्याचे महत्वपूर्ण निरिक्षण या अहवालात नमूद केले आहे. प्रामुख्याने ही वाढ बाजारातील वाढती मागणी,ग्राहकांची पसंती, लोअर बेस, पायाभूत सुविधा यामुळे झाल्याचे महत्वाचे निरिक्षण अहवालात मांडले गेले. अहवालातील माहितीनुसार, येत्या काही दिवसांत टिअर २, ३ शहरातील वाढत्या मागणीमुळे तसेच नव्या बाजारपेठेमुळे क्विक कॉमर्समध्ये दुहेरी अंकांने वाढ अपेक्षित आहे. खासकरून गेल्या काही वर्षांत भारतात मोठ्या प्रमाणात या क्षेत्रातील वितरण नेटवर्क मध्ये प्रामुख्याने बदल घडून आले होते. यात आता आणखी वाढ होऊ शकते.


अहवालातील अंदाजानुसार डार्क स्टोअरमध्ये आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ७१% एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे म्हटले. वाढलेल्या स्टोअरसह ग्राहकांच्या मागणीतही वेगाने वाढ झाल्याने आर्थिक वर्ष २५ मध्ये ग्राहकामागील सरा सरी महसूल (Average Revenue Per User ARPU) मध्ये २५% वाढ झाली. महत्वाचे म्हणजे पूर्वीसारखे स्टार्टअप,नव्या, जुन्या कंपन्या आपल्या विस्तारापूर्वी प्रथमच नफ्यात लक्ष केंद्रित करत आहेत त्यामुळे महसूलातही वाढ झाल्याने कंपनीच्या आर्थिक स्थितीत मजबूती असल्याचे अहवालात म्हटले आहे. कंपनी आपल्या शाश्वत विकासाकडे, तसेच आपल्या अस्तित्वासाठी अधिक लक्ष केंद्रित करत असल्यामुळे ही वाढ अपेक्षित होती.


अहवालात अधिक भाष्य करताना कंपनीने नेमक्या शब्दात म्हटले आहे,' वाढते शहरीकरण, बदलत्या ग्राहक जीवनशैली आणि वाढत्या डिस्पोजेबल उत्पन्नासारखे संरचनात्मक (Structural) ट्रेंड जलद अँप (Fast App) आधारित खरेदी अनुभवांना अनुकूल आहेत,ज्यामुळे उद्योगाच्या वाढीला चालना मिळते. प्रमुख एफएमसीजी (FMCG) ब्रँड प्लॅटफॉर्म-विशिष्ट SKU (Stock Keeping Unit), प्रिमियम ऑफरिंग आणि मार्केटिंग भागीदारीद्वारे Q-कॉमर्सचा स्वीकार करत आहेत,ज्यामुळे उत्पादनाची विविधता वाढत आहे आणि सरासरी ऑर्डर मूल्ये वाढत आहेत. त्याच वेळी कंपन्या डार्क स्टोअर्स, टेक इन्फ्रास्ट्रक्चर आणि डिलिव्हरी ऑप्टिमायझेशनमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत, ज्यामुळे कार्यक्षम आणि स्केलेबल ऑपरेशन्ससाठी पाया रचला जात आहे. एकत्रितपणे, हे घटक भारताच्या विकसित होत असलेल्या रिटेल लँडस्केपमधील प्रमुख स्तंभांपैकी एक बनण्यासाठी Q-कॉमर्स उद्योगाला समर्थन देत आहेत.' असे म्हटले.


अहवालानुसार, ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यु (GOV) पेक्षाही अधिक वेगाने क्विक कॉमर्सने अधिक फी मिळवली आहे. फीवर आधारित, कंपनीच्या जो महसूल ४५० कोटींवर आर्थिक वर्ष २०२२ मध्ये होता तो आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत १०५०० कोटींवर गेला आणि आगामी आर्थिक वर्ष २०२८ पर्यंत ३४५०० कोटींवर जाण्याची शक्यता आहे असे निरीक्षण नोंदवले गेले आहे. आणखी एक निरिक्षण म्हणजे आर्थिक वर्ष २०२५-२८ मध्ये सीएजीआरमध्ये २६ ते २८% वाढ झाली. ही वाढ होण्यामागे प्रामुख्याने कॉमर्स कंपन्यांच्या कमाईत झालेल्या वाढीमुळे शक्य झाले.


अहवालातील आणखी एक निरिक्षण म्हणजे, 'भारतातील क्यू-कॉमर्समधील वाढ डिजिटल वापराच्या वाढत्या वापरामुळे आणि ग्राहकांच्या खर्चाच्या क्षमतेमुळे जोरदारपणे चालना मिळाली आहे. २०२५ च्या सुरुवातीला देशात १.१२ अब्जाहून अधिक मोबाइल कनेक्शन होते, ज्यामध्ये ८०६ दशलक्ष इंटरनेट वापरकर्ते (User) होते, जे वर्ष-दर-वर्ष (Year on Year YoY) बेसिसवर ६.५% वाढ दर्शवते आणि वर्षअखेरीस ९०० दशलक्ष वापरकर्त्यांपेक्षा जास्त वापरण्याचा आमचा अंदा ज आहे 'असे म्हटले. भारतीय घरांमध्ये स्मार्टफोनचा वापर वाढत आहे, ज्यामध्ये ग्रामीण भागात वाढता वाटा आहे, मुख्यतः कमी डेटा खर्चामुळे आणि सरकारी उपक्रमांमुळे झाली आहे.' असेही अहवालात यासंदर्भात म्हटले गेले आहे.


याविषयी प्रतिक्रिया देताना,' भारताचा क्यू-कॉमर्स बाजार आर्थिक वर्ष २८ पर्यंत ३ पट वाढेल, ज्यामध्ये ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यू (GOV) जवळजवळ २ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल आणि प्लॅटफॉर्म फी महसूल ३४००० कोटी रुपयांपेक्षा जास्त होईल अशी अपेक्षा आहे. वाढ मजबूत असली तरी जलद विस्तारापासून नफा आणि कार्यक्षमतेचे पुनरुज्जीवन करण्याकडे लक्ष केंद्रित केले जात आहे. पुढे जाऊन, टियर २ आणि ३ शहरांमध्ये सखोल प्रवेश आणि तंत्रज्ञान-नेतृत्वाखालील नव कल्पना भारताच्या क्यू-कॉमर्स लँडस्केपच्या पुढील टप्प्याची व्याख्या करतील,'असे केअरएज अ‍ॅडव्हायझरी अँड रिसर्चच्या वरिष्ठ संचालक आणि प्रमुख तन्वी शाह म्हणतात.


केअरएज अ‍ॅडव्हायझरी अँड रिसर्चच्या सहाय्यक संचालक अमीर शेख पुढे अहवालविषयी म्हणाल्या,' क्यू-कॉमर्स उद्योग अजूनही भारताच्या मोठ्या किराणा बाजारपेठेच्या सुमारे १% आहे, परंतु हेच ते रोमांचक बनवते. अधिकाधिक ग्राहकां नी ते देत असलेल्या वेग आणि सोयीचा स्वीकार केल्याने, क्यू-कॉमर्स वेगाने वाढण्यास सज्ज आहे, जरी व्यापक किराणा बाजाराची वाढ स्थिर राहिली तरी.' त्यामुळे या क्षेत्रात आगामी काळात मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. डिजिटली प्रबळ झाल्यामुळे सेवा क्षेत्रातील अर्थव्यवस्थेत वाढ होण्याप्रमाणेच क्विक कॉमर्सची वाढही वेगाने अपेक्षित असल्याचे सध्या म्हटले जात आहे.

Comments
Add Comment

Jane Street: बाजाराला आणखी एक खळबळजनक पाचर ! जेन स्ट्रीट प्रकरण आणखी गुंतवणूकदारांचे नुकसान करणार? काय आहे नवी घडामोड जाणून घ्या

प्रतिनिधी: बाजारातील गुंतवणूकदार पुन्हा एकदा दबावाखाली येऊ शकतो. जेन स्ट्रीट प्रकरणानंतर संपूर्ण बाजार ढवळून

gold silver marathi news: सोन्यात सलग तिसऱ्यांदा वाढ ! चांदीत तीन आठवड्यानंतर मोठी उसळी! 'ही' आहेत वाढीमागील कारणे !

प्रतिनिधी: सलग तिसऱ्यांदा सोन्याच्या दरात तुफानी आली आहे. विशेष म्हणजे चांदीच्या दरातही जबरदस्त वाढ झाली आहे.

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या नुकसानाचा पुरावा दाखवा! अजित डोवाल यांचे विदेशी माध्यमांना खुले आव्हान

चेन्नई : पाकिस्तानच्या विरोधातील ऑपरेश सिंदूर दरम्यान भारताच्या कुठल्या भागात नुकसान झाले याचा एक तरी फोटो

share market marathi: 'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: बाजारात सातत्याने घसरण सुरूच ! सेन्सेक्स व निफ्टीसह बँक निर्देशांकही घसरला, ट्रम्पग्रस्त दबाव हा कायम राहणार? जाणून घ्या सविस्तर...

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे. अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर मोठी घसरण

Eknath Shinde : उदय सामंत म्हणतात, 'मुख्यमंत्री व्हायला कुवत अन् धमक लागते', तर खासदार म्हस्के म्हणाले राऊतांना मेंटल हॉस्पिटलमध्ये... राऊतांच्या गौप्यस्फोटावर शिंदेंच्या नेत्यांची तिखट प्रतिक्रिया

मुंबई : राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुपचूप दिल्ली दौरा करून

नवी मुंबईत पुनर्विकासाला मोठा दिलासा: धोकादायक इमारतींचा मार्ग मोकळा!

नवी मुंबईतील रखडलेले पुनर्विकास प्रकल्प आता मार्गी लागणार, विकासकांना हमीपत्र देऊन करता येणार पुनर्विकास नवी