मुंबई : महायुती सरकारमधील शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका कार्यक्रमात बोलताना संजय शिरसाट यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली. आता यापुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत, असे विधानही यावेळी संजय शिरसाट यांनी या कार्यक्रमात केलं होत. संजय शिरसाट यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून महाराष्ट्राच्या राजकारणात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
ठळक मुद्दे - दरवर्षी १०.५०% पर्यंत प्रभावी उत्पन्न क्रेडिट रेटिंग (Credit Ratings): क्रिसिल ए+/ क्रिसिल रेटिंग्ज लिमिटेड द्वारे स्थिर केवळ डीमटेरियलाइज्ड (Dematerilised) ...
ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत
आयकर विभागाकडून नोटीस आल्याची जाहीर कबुली संजय शिरसाट यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एका कार्यक्रमात संजय शिरसाट यांनी केलेले वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. आता यापुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत, असे विधान त्यांनी केले आहे. तसेच हे वक्तव्य माझ्यासाठीच असल्यासही देखील त्यांनी म्हटले आहे.
पैसे कमावणे सोपं, मात्र पैसे वापरणे अवघड
२०१९ साली निवडणुकीत तुमची संपत्ती इतकी होती तर २०२४ साली तुमची संपत्ती इतकी कशी झाली? असं विचारल्याचे देखील संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांना नऊ तारखेला खुलासा करण्याबाबत सांगितलं होतं, अशी माहिती देखील संजय शिरसाट यांनी दिली आहे. पैसे कमावणे सोपं आहे. मात्र ते वापरायचे कसे हे अवघड झाल्याचं देखील संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. दरम्यान, संजय शिरसाट यांना आयकर खात्याकडून नोटीस आल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.