निलेश राणे यांच्या मागणीला यश, कुडाळ मालवण वीज प्रकरणी ऊर्जा राज्य मंत्र्यांची तात्काळ बैठक

सिंधुदुर्ग: विधानसभेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज समस्यांवर आवाज उठवत शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी महावितरण आणि ऊर्जा विभागावर थेट सवाल केले. या मुद्द्यावर उबाठा गटाचे भास्कर जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनीही उघडपणे पाठिंबा दर्शवला आहे. राणेंनी लक्षवेधी सूचनेद्वारे वीज वितरणात असलेल्या अडचणी, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हाल, वीजपुरवठ्याचा कमी दाब, आणि रखडलेले भूमिगत वीज प्रकल्प यावर सरकारला घेरले.

यादरम्यान निलेश राणे यांनी काही आरोप आणि गंभीर टीका केल्या आहेत.  “महावितरणमध्ये ९० टक्के कंत्राटी कर्मचारी आहेत. मात्र त्यांना कामाचं प्रशिक्षणही दिलं जात नाही, आतापर्यंत ११ कंत्राटी कामगार गेले, मात्र कोणालाच मदत मिळाली नाही,"असा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांनी “१५ वर्षांपासून भूमिगत वायर टाकण्याच्या कामात रस्ते खोदले जात आहेत, पण काम पूर्ण होत नाही,” अशी खंतही व्यक्त केली. आम्हाला किरकोळ मदत नको, भरीव निर्णय घ्या, असा ठाम आग्रह त्यांनी धरला.

नीलेश राणे यांच्या मुद्द्यावर या नेत्यांचा दुजोरा 


या मुद्द्याला पाठिंबा देताना भास्कर जाधव म्हणाले की, “सिंधुदुर्गात वीज प्रश्न गंभीर आहे. राणेंनी योग्य मुद्दा उपस्थित केला आहे.” रोहित पवार यांनीही “ऊर्जा विभागातील ढिसाळ कारभाराला वेळीच आवर घालणे आवश्यक आहे,” असे मत व्यक्त केले. याविषयी उत्तर देताना मंत्री मेघना बौर्डिकर यांनी कुडाळ मालवण विषय प्रश्नावर लवकरच बैठक आयोजित करून तोडगा काढणार असल्याचं सांगितलं.
Comments
Add Comment

तणाव वाढला, तैवान जवळ पोहोचला चिनी विमानांचा आणि जहाजांचा ताफा

तैपेई : चीन आणि तैवान यांच्यातील तणाव वाढू लागला आहे. चिनी विमानांचा आणि जहाजांचा ताफा तैवान जवळ पोहोचू लागला

ठाणे पोलिसांनी ज्येष्ठांसाठी विकसित केला ‘आधारवड’ मोबाइल अॅप

ठाणे : ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या

सुबोध भावे साकारणार निम करोली बाबा

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेता सुबोध भावे आता हिंदी सिनेसृष्टीत एक मोठी झेप घेत आहे. तो लवकरच येणाऱ्या

५८ दिवसांच्या स्मरणकोषाचे नाट्य...!

५८ दिवसांच्या स्मरणकोषाचे नाट्य...! महाभारत या महाकाव्याच्या संदर्भाने सांगायचे तर, दक्षिणायन व उत्तरायण यात

सोलापूर विभागात पहिली ‘कवच’ चाचणी यशस्वी

मुंबई : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी रविवारी सोलापूर विभागात ‘कवच’ प्रणालीच्या यशस्वी लोको

शेअर बाजारातील प्राथमिक मार्केट...

डॉ. सर्वेश सुहास सोमण आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे खासगीरीत्या आयोजित