पुण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला राडा

  37

पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कोथरूड येथील केदार सोमण यांच्या घराबाहेर गोंधळ घातला. पोलिसांनी हस्तक्षेप करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. केदार सोमण यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

कोथरूड येथे राहणाऱ्या केदार सोमण यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. ही पोस्ट व्हायरल होऊ लागताच मनसे प्रवक्ते हेमंत संभूस यांच्या अध्यक्षतेखाली केदार सोमण यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी कारवाई केली.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी आधी सोमण यांच्या घराचा दरवाजा ठोठावला आणि दार उघडण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण सोमण यांनी घराचे दार उघडले नाही. तोपर्यंत कोथरूडच्या इंद्रधनु सोसायटीत गडबड सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारापासून दूर केले. रस्त्यावर थांबवले. यानंतर पोलिसांनी केदार सोमण यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलीस केदार सोमण यांना व्हॅनमध्ये घेऊन जात होते त्यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. पण पोलिसांनी तातडीने केदार सोमण यांना घटनास्थळापासून दूर नेले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

 
Comments
Add Comment

कन्नड तहसील कार्यालयासमोरची नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात ठिकठिकाणी सतत पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक जुनं बांधकाम असलेल्या इमारतींची

अरे बापरे! पुण्यात हे चाललंय तरी काय? घरात घुसून डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर बलात्कार!

पुणे: पुणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कोंढवा भागातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये

आषाढी वारीच्या पार्श्वभुमीवर उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई: १४ लाख ५० हजारांहून अधिक मुद्देमाल जप्त!

सोलापूर: पंढरपूरची आषाढी वारी काही दिवसांवर आली असताना, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर जिल्ह्यात अवैध

तृतीय पंथीयांनाही एसटीत ५० टक्के सवलत

मुंबई : महिलांना एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यानंतर आता राज्यातील तृतीय पंथीयांनाही एसटीच्या प्रवासात

साई मंदिरात करोडोंच्या श्रद्धेवर दरोडा !

शिर्डी :  जगभरातील कोट्यवधी साईभक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या शिर्डीच्या साई मंदिरात चोरट्यांचा

साईबाबांच्या तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला ९ जुलै पासून प्रारंभ

शिर्डी : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था ( शिर्डी )च्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी बुधवार दि.०९ जुलै