चंद्रपूरातील नाल्याच्या संरक्षण भिंतीचे प्रकरण विधानसभेत गाजले!

मुंबई: चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात हवेली गार्डन ते आकाशवाणी रोडवरील नाल्याच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी ९५ लाख रुपये खर्च करण्यात आले. पण येथे निर्माण होणारी पुर परिस्थिती लक्षात न घेता ही भिंत बांधल्याचे दिसते. चुकीच्या ठिकाणी बांधकाम केल्याचे दिसून येते. याची चौकशी करून कारवाई करणार का? असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत विचारला.


याच प्रश्नाला धरुन केवळ एका बाजूलाच भिंत उभारली आहे. शिवाय दोन धनाढ्य लोकांचे बंगले या नाल्याच्या शेजारी आहेत तेवढीच संरक्षण भिंत बांधली आहे. एका व्यक्तीला त्याच्या जागेला संरक्षण देण्यासाठी ९८ लाख रुपये खर्च झाला आहे. भर टाकून नाला बांधला आहे याची चौकशी करा आणि या नाल्याची रुंदी पहिल्याप्रमाणे राहिल का? असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी विचारला. तसेच मुनगंटीवार यांना बोलण्यास मर्यादा आहे. ते बांधकाम चुकीचे झाले आहे. म्हणून चुकीचे बांधकाम करण्यात जे जे दोषी आहेत त्यांच्या वर कारवाई करणार का? हा प्रश्न आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.



मुनगंटीवार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री संजय राठोड यांनी सांगितले की, हे काम जिल्हा नियोजन समिती मधून केले होते. मुख्य भागातून नाला जातो. उर्वरित बांधकाम बाबत जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवतो तसेच भूमिलेख अभिलेखाकडून याची निश्चितपणे चौकशी केली जाईल, असे आश्वासन सभागृहात दिले.


यावर निश्चितपणे नैसर्गिक राहील, असे अॅक्शन घेण्याचे आदेश द्या, हे काय दादा कोंडकेंचे डबल मिनिंग उत्तर आहे का? असे मुनगंटीवार म्हणाले. तर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या प्रश्नाची दखल घेऊन नाल्याची नैसर्गिक रुंदी राखण्यात यावी, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्देश दिले.

Comments
Add Comment

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध