शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर १६ जुलैला होणार सुनावणी

नवी दिल्ली : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने सर्वोच्च न्यायालयात पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सुरू असलेल्या प्रकरणाची सुनावणी लवकर घेण्याची मागणी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे ही सुनावणी आवश्यक असल्याचे उद्धव सेनेच्या वकिलांनी सांगितले. परंतू, सर्वोच्च न्यायालयाने त्यावर त्वरित सुनावणी घेण्यास नकार दिला असून येत्या १६ जुलै रोजी नियमित खंडपीठासमोरच हा विषय मांडला जाईल, असे सांगितले.


उद्धव सेनेच्या वतीने ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी बुधवारी (दि.२) स्थानिक निवडणुकांचा हवाला देत पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत लवकर सुनावणीची मागणी केली. या मागणीला विरोध करताना शिंदे गटाच्या वकिलांनी सांगितले की, निवडणूक चिन्ह वाटपानंतर २ महत्त्वाच्या निवडणुका (लोकसभा आणि विधानसभा) झाल्या आहेत. ७ मे रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील नियमित खंडपीठासमोरही हीच मागणी करण्यात आली होती.



यावेळी खंडपीठाने या प्रकरणाची लवकरच सुनावणी घेण्यास नकार दिला. आता पुन्हा एकदा सुट्टीतील खंडपीठासमोरही तोच प्रयत्न केला जातोय. त्यावर उद्धव सेनेच्या वकिलांनी म्हटले की, ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार-अजित पवार वादात दिलेल्या व्यवस्थेची मागणी करत आहेत. यावर न्यायमूर्ती एमएम सुंदरेश यांच्या अध्यक्षतेखालील सुट्टीतील खंडपीठाने त्यांना १६ जुलै रोजीच आपला मुद्दा मांडण्यास सांगितले आहे.


दरम्यान, १७ फेब्रुवारी २०२३ रोजी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेवरील दावा योग्य असल्याचे म्हटले होते. आयोगाने शिवसेनेचे मूळ निवडणूक चिन्ह 'बाण-धनुष्य' हेदेखील शिंदे गटाला दिले होते. याविरुद्ध उद्धव गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेव्हापासून हे प्रकरण प्रलंबित आहे. या काळात लोकसभा, विधानसभा निवडणूक पार पडली आता शिवसेनेचा जीव असलेली मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आहे. यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांचे परंपरागत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हवे आहे. यासाठी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यासाठी मागणी करण्यात आली आहे.


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे ही सुनावणी आवश्यक असल्याचे उद्धवसेनेच्या वकिलांनी सांगितले.

Comments
Add Comment

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे