बीड विनयभंग प्रकरण: आरोपी विजय पवारवर आणखी गंभीर आरोप; एसआयटी चौकशीचे आदेश

बीड : बीड जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी विजय पवार याच्यावर आणखी एका पीडितेच्या पालकांनी गंभीर आरोप केले आहेत. दोन वर्षांपूर्वीही विजय पवारने आपल्या मुलीचा छळ केल्याचे या पालकांचे म्हणणे आहे. या वाढत्या आरोप-प्रत्यारोपांनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी (Special Investigation Team) चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

विजय पवारवर "बॅड टच" आणि छळाचे आरोप

नवीन आरोपानुसार, विजय पवार हा आपल्या मुलीला केबिनमध्ये बोलावून 'बॅड टच' करायचा, असा दावा पीडितेच्या पालकांनी केला आहे. विजय पवार संचालक असलेल्या एका शाळेत दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एका विद्यार्थिनीला शाळेत झालेल्या वादामुळे त्रास दिला गेला होता. त्यावेळीही मुलीला शाळेबाहेर उभे करणे किंवा केबिनमध्ये बोलावून छेडछाड करणे असे प्रकार घडले होते. या पालकांनी गेल्या दोन वर्षांपासून यावर कारवाईसाठी पाठपुरावा केला होता, परंतु अद्याप कोणतीही कारवाई झाली नव्हती. आता पोलीस अधीक्षकांनी केलेल्या आवाहनानंतर हे पालक समोर आले असून त्यांनी आपली तक्रार दाखल केली आहे. आता पोलीस अधीक्षक या तक्रारीची चौकशी करणार आहेत.

नेमके काय आहे प्रकरण?

बीडमधील नामांकित उमाकिरण शैक्षणिक संकुलातील एका खासगी क्लासेसमध्ये जुलै २०२४ ते २५ मे २०२५ या कालावधीत एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची तक्रार २६ जून २०२५ रोजी शिवाजीनगर पोलिसांत दाखल झाली होती. याच दिवशी पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आरोपी प्रशांत खाटोकर आणि विजय पवार हे दोघे फरार झाले होते. २८ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेने विजय पवारला लिंबागणेश परिसरातून, तर प्रशांत खाटोकरला चौसाळा बायपासवरून ताब्यात घेतले. २९ जून रोजी या दोघांनाही बीड जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

धनंजय मुंडेंनी केले गंभीर आरोप
या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार धनंजय मुंडे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले. गुन्हा दाखल झाला त्या दिवशी रात्री ११ वाजता संदीप क्षीरसागर आरोपींसोबत होते आणि आरोपींना त्यांचे पाठबळ आहे, असे मुंडे यांनी म्हटले. संदीप क्षीरसागर आणि आरोपींचे संबंध समोर यावेत यासाठी सखोल चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.
Comments
Add Comment

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद

हाकेंनी जरांगेंसमोर मांडला ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव, म्हणाले...

"पाटील, ९६ कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले नाहीत, तर मग आपल्यात ११ विवाह जाहीर करू": लक्ष्मण हाकेंचा टोला बीड: ओबीसी