Devendra Fadanvis : "...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात", CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

  88

'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही'- मुख्यमंत्री फडणवीस


मुंबई : आज विधानसभेत टोरेस कंपनीच्या (Torres Company) घोटाळ्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. अशा प्रकारच्या आर्थिक फसवणुकीच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. याबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले. पोलिसांकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांबद्दलही मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती दिली.


सिस्का एल.ई.डी. कंपनीच्या संचालकांनी पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला. आ. भीमराव तापकीर यांनी हा प्रश्न उपस्थित केला. तर नाना पटोले आणि जितेंद्र आव्हाड यांनी या चर्चेत सहभाग घेतला.


यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "अशा प्रकारची आमिषे दाखवणाऱ्या कंपन्या, आकर्षक परतावा देण्याच्या योजना चालवणाऱ्या कंपन्या याच्यामध्ये गुंतवणूक करू नका अशी मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. जाहिराती पण दिल्या आहेत. त्यासंदर्भात जनजागृतीची मोहिमही हाती घेण्यात आली आहे. अर्थात अशी कंपनी सुरू झाल्याबरोबर पोलिसांना कारवाई करण्याचा मार्ग नाहीये. कारण अशी कंपनी सुरू करण्यासाठी कंपनी अधिनियमाच्या अंतर्गत नोंदणी करावी लागते. पोलिसांची परवानगी घ्यावी लागत नाही."




...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात -फडणवीस


"आपण आर्थिक गुप्तचर शाखाही सुरू केली आहे. कंपन्यांनी अधिकचा नफा देणाऱ्या जाहिराती दिल्या. तर त्या आधारावर कारवाई आपण करतो आहे. पण, यामध्ये व्यापक जनजागृती हाच एक महत्त्वाचा विषय आहे. कारण अनेकवेळा अशा घटना घडलेल्या आहेत की, या कंपन्या नोंदणीकृतही नसतात. कुणाची परवानगी नसते. थेट बोर्ड लावतात. लोकांकडून पैसे घेतात. पहिले दोन-तीन महिने व्याज सांगितलेलं असतं, तसं परत करतात. नंतर सगळा गाशा गुंडाळून गायब होतात", असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.



फडणवीसांचं जनतेला आवाहन


"मी या सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला विनंती करतो की, कुणीही तुम्हाला अधिकचं व्याजदर देण्याची हमी देत असेल किंवा तशी योजना आणत असेल, तर विश्वास ठेवू नका. त्यांच्याकडे सगळ्या परवानग्या आहे की, नाही बघा. ते कशाच्या आधारावर देणार आहेत? कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या फसवणुकीच्या संदर्भात लोकांनी जागरूक राहिले पाहिजे. पोलिसही जास्तीत जास्त जाणीव जागृतीचा कार्यक्रम हाती घेतील", अशी माहिती फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

Comments
Add Comment

बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिका बँकेच्या निवडणुकीत उबाठाच्या जय सहकारचा धुव्वा

युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा मान; घरबसल्या दर्शनासाठी विशेष पोर्टल सुरू

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र

महाराष्ट्रातील १ कोटी बहीणींना लखपती दीदी करणार

मुंबई : लखपती दीदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात

मुंबई महापालिकेची प्रभाग रचना जाहीर

येत्या ०४ सप्टेंबरपर्यंत नागरिकांना नोंदवता येणार हरकती, सूचना मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक