मुरबाड तालुक्यातील ११ जिल्हा परिषद शाळा शिक्षकांविना

  79

सामाजिक कार्यकर्ते दिनेश जाधव यांचा आंदोलनाचा इशारा!


मुरबाड : मुरबाड तालुक्यातील ११ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी कायमस्वरूपी एकही शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोकादायक आहे. सामाजिक कार्यकर्ते दिनेश जाधव यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी यांचेकडे यासंबंधीचे निवेदन देऊन नाराजी व्यक्त केली आहे.


मुरबाडमधील जिल्हा परिषदेच्या एकूण ३२९ जिल्हा परिषद शाळा आहेत. यापैकी ९ केंद्रातील ११ शाळांना एकही शिक्षक नाही. अंदाजे ३५० विद्यार्थी एकही शिक्षक नसलेल्या शाळेत शिक्षण घेतात. गट शिक्षण अधिकारी मुरबाड यांच्याशी संपर्क साधला असता जवळच्या शाळेतील तात्पुरती शिक्षक दिले असल्याचे सांगितले. शासनाच्या धोरणानुसार बहुतांश शाळांना मोजके शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने अनेक पालकांनी आपल्या पाल्यास खासगी शाळेत दाखल केल्याचे समजते.


या शैक्षणिक धोरणाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्या कमी झाल्याचे दिसून येते. याबाबत अनेक पालकांनी रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दिनेश जाधव यांच्याशी संपर्क साधून खंत व्यक्त केली असता त्यांनी येत्या आठ दिवसांत ११ शाळांना कायमस्वरूपी शिक्षक न दिल्यास पक्षाच्या वतीने ११ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन पंचायत समिती मुरबाड येथे शाळा भरविण्यात येईल असा गर्भित इशारा शालेय प्रशासनाला दिला आहे.

Comments
Add Comment

Eknath Shinde: ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी तातडीने दूर करा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश

ठाणे परिसरातील वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश  ठाणे: ठाणे आणि परिसरातील वाहतूक

कल्याणमध्ये कोकण वसाहतीच्या पुनर्विकासासाठी आमरण उपोषण

चौदा वर्षे उलटूनही बाधित सदनिकाधारकांची फरफट थांबेना कल्याण : सुमारे चौदा वर्षे उलटूनही कल्याण पश्चिमेतील कोकण

उबाठा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

रामदास कांबळे यांची युवासेना कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती जाहीर ठाणे: मुंबई महानगरपालिकेतील सायन कोळीवाडा

भारत महासत्ता न होण्यासाठी तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचा परकीय शक्तींचा डाव

आयआरएस समीर वानखेडे यांचे वक्तव्य कल्याण  : ''आपला भारत देश हा महासत्ता होण्याच्या दिशेने अतिशय विश्वासाने आणि

पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

कल्याण : पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमुळे राज्य गुप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख

ठाणेकरांनो, पाण्याचा जपून वापरा करा

मंगळवारी ८ तास पाणीपुरवठा बंद डोंबिवली  : केडीएमसीच्या कल्याण (पूर्व) परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील