अक्षय कुमार-प्रियदर्शन बरोबरच्या वादावर पडदा
मुंबई : परेश रावल यांनी हेरा फेरी ३ चा वाद संपुष्टात आणत या चित्रपटात परतण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. काही दिवसांपूर्वी मतभेदांमुळे परेश रावल यांनी हेरा फेरी ३ हा चित्रपट सोडला होता.ज्यामुळे चाहते निराश झाले होते. पण,आता या चित्रपटात परतण्याची पुष्टी त्यांनी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सर्वांनी एकत्र येऊन कठोर परिश्रम करावे अशी आपली इच्छा आहे. परेश रावल यांना एका पॉडकास्टमध्ये हेरा फेरी ३ शी संबंधित वादाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
मुंबई : राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषेसंबंधी काढण्यात आलेले जीआर राज्य शासनाने रद्द ठरवले. हा मराठी माणसाच्या एकजुटीचा विषय असल्याचं ...
या वादावर काय म्हणाले परेश रावल?
परेश रावल यांनी त्याला उत्तर देताना म्हटलंय, 'नाही, कोणताही वाद नाही. मला वाटते की, जेव्हा प्रेक्षकांना एखादी गोष्ट खूप आवडते तेव्हा तुम्ही जास्त काळजी घेतली पाहिजे. प्रेक्षकांप्रती आपल्या काही जबाबदाऱ्या असतात. प्रेक्षकांनी तुमचे खूप कौतुक केले आहे. तुम्ही गोष्टी हलक्यात घेऊ शकत नाही. कठोर परिश्रम करून त्या द्या. शेवटीप्रत्येकजण खूप सर्जनशील आहे. मग तो प्रियदर्शन असो, अक्षय कुमार असो किंवा सुनील शेट्टी असो. ते माझे वर्षानुवर्षे मित्र आहेत.' परेश रावल हेरा फेरी ३ चा भाग होते. पण त्यांनी अचानक एका मुलाखतीत चित्रपट सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार करत आहे. अशा परिस्थितीत परेश रावल अचानक चित्रपट सोडल्याची बातमी आल्यानंतर अभिनेत्याच्या टीमने त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली. अक्षयच्या वकीलांनी सांगितले होते की, निर्मिती कंपनीने चित्रपटावर खूप पैसे खर्च केले आहेत. त्यामुळे या प्रकरणात कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
‘हेरा फेरी ३’ बद्दलचा वाद काय होता?
परेश रावल यांच्या या संभाषणातून हे स्पष्ट होते की हेरा फेरी ३ बद्दल सुरू असलेला जो काही वाद अखेर मिटला आहे. यासोबतच, चित्रपटातील बाबू भैयाच्या भूमिकेच्या पुनरागमनाबद्दल एक संकेत देखील मिळाला आहे. आता निर्माते हेरा फेरी ३ मध्ये परेश रावलच्या पुनरागमनाला अधिकृतपणे कधी पुष्टी देतात हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तसेच, यापूर्वी परेश रावल यांनी स्वतः हेरा फेरी ३ सोडल्याची पुष्टी केली होती. तसेच, ११ लाख रुपयांची साइनिंग रक्कम १५% व्याजासह निर्मात्यांना परत करण्यात आली आहे. आता त्यांच्या पुनरागमनामुळे चाहते खूप खुश झाले आहेत.