व्यायाम केल्यानंतर ही चूक कधीही करू नका ...

मुंबई : फिटनेस जपण्यासाठी चालणे, धावणे, जिम करणे या पद्धतीने घाम गाळण्यावर हल्ली अनेकांचा भर असतो. व्यायाम केला की शरीर घामाने भिजते. थकवा येतो. शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. घसा कोरडा पडतो. या परिस्थितीत अनेकजण लगेच पाणी पितात. व्यायाम करत असताना किंवा केल्यानंतर लगेच पाणी पिणे योग्य आहे का ? व्यायाम केल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे ? चला जाणून घेऊ.



व्यायामादरम्यान, शरीराला खूप घाम येतो, ज्यामुळे शरीरातील पाणी आणि आवश्यक खनिजे कमी होतात. पाणी शरीरातील तापमान नियंत्रित करते, सांधे आणि स्नायू चांगल्या स्थितीत ठेवते. अशा परिस्थितीत, जर पाणी प्यायले नाही तर थकवा, डोकेदुखी आणि अशक्तपणा यासारख्या समस्या उद्भवू शकतात. परंतु व्यायामानंतर लगेच पाणी प्यावे की काही वेळानंतर, जाणून घेऊया.


व्यायामानंतर लगेच पाणी पिणे सुरक्षित आहे का ?


व्यायामानंतर पाणी पिता येते, परंतु यासाठी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. व्यायाम करताना आपलं शरीर उष्णता निर्माण करतं, ज्यामुळे घामाच्या स्वरूपात पाण्याचा आणि इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण कमी होते . यामुळे शरीरातील पाणीपातळी कमी होते आणि आपण डीहायड्रेट होतो. हे टाळण्यासाठी व्यायामानंतर योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने पाणी पिणं अत्यावश्यक आहे.


व्यायामानंतर पाणी कधी प्यावे ?


व्यायामानंतर पाणी पिण्याची योग्य वेळ ही व्यायाम संपल्यानंतर १० ते १५ मिनिटांच्या आत असते. एकाच वेळी भरपूर पाणी पिण्याऐवजी हळूहळू आणि कमी प्रमाणात पाणी पिणे चांगले. यावेळी शरीर अत्यंत सक्रिय असतं आणि उष्णतेचा परिणाम अजूनही सुरू असतो. त्यामुळे शरीराला लगेच पाण्याची गरज असते. पाणी प्यायल्यामुळे शरीरातील हरवलेली आर्द्रता पुनर्संचित होते. यावेळी शरीर अत्यंत सक्रिय असतं आणि उष्णतेचा परिणाम अजूनही सुरू असतो. त्यामुळे शरीराला लगेच पाण्याची गरज असते. पाणी प्यायल्यामुळे शरीरातील हरवलेली आर्द्रता पुनर्संचित होते. यानंतरच्या एका ते दोन तासांमध्ये देखील थोडं-थोडं पाणी प्यावं. यानंतरच्या एका ते दोन तासांमध्ये देखील थोडं-थोडं पाणी प्यावं. फ्रिजमधील थंड पाणी किंवा बर्फाचे थंड पाणी पिणे टाळावे. यामुळे सर्दी-खोकला, पचनाच्या समस्या किंवा वजन वाढण्याची शक्यता असते. उभे राहून पाणी पिण्याऐवजी, बसून आणि आरामात पाणी प्यावे. जर तुम्हाला कसरत केल्यानंतर खूप घाम येत असेल तर तुम्ही नारळ पाणी किंवा इलेक्ट्रोलाइट्स असलेले पाणी पिऊ शकता, यामुळे शरीरातील पाण्यासोबतच खनिजांची कमतरता पूर्ण होऊ शकते. गरम पाणी पिणे देखील हानिकारक असू शकते, त्यामुळे शरीरात आवश्यक खनिजांची कमतरता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे उलट्या, डोकेदुखी, अशक्तपणा येऊ शकतो.


व्यायामानंतर किती पाणी प्यावे ?


व्यायाम करताना पाण्याची गरज व्यक्तीचे वय, वजन, हवामान आणि व्यायामाची गुणवत्ता यावर अवलंबून असते. साधारणपणे, व्यायाम केल्यानंतर २०० ते ४०० मिली पाणी पिता येते. तथापि, जर व्यायाम बराच लांब आणि तीव्र असेल, तर दर १५ ते २० मिनिटांनी १०० ते २०० मिली पाणी पिता येते.


व्यायामानंतर पाणी पिण्याचे फायदे


शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.
पाणी शरीराला थकवा, डोकेदुखी किंवा स्नायूंच्या आकुंचनापासून वाचवते.
शरीराचे तापमान आणि इलेक्ट्रोलाइट संतुलन राखते.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या