EPFO News: खबरदार ! निवृत्तीना नवा फॉर्म भरावा लागेल ही फेक न्यूज !फॅक्ट चेक - पेन्शनधारकांना कुठलाही नवा फॉर्म भरण्याची गरज नसेल 'ही' नवी अपडेट समोर

प्रतिनिधी: खबरदार! जर तुम्ही फेकन्यूज पाहत असाल तर! नुकतीच ईपीएफ ओ संदर्भात खोटी बातमी पसरली होती.जर २८ जुलै पर्यंत नवा ईपीएफओ (EPFO) फॉर्म न भरल्यास निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन (Pension) रोखले जाईल मात्र ही खोटी बातमी ठरली आहे. प्रेस ब्युरोकडून (Press Bureau of Information)अशी कुठलीही नोटिस ईपीएफओकडून देण्यात आलेली नाही. याशिवाय आणखी एक घडामोड म्हणजे २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी संस्थेने पीएएफ खात्यात खातेदारांच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्याच्या प्रकिया सुरू केली असल्याचे म्हटले जात आहे.

PIB Fact Check - पीआयबी फॅक्ट चेक -

यानुसार ही माहिती खोटी आहे. पीआयबी (PIB Fact Check) ने एक्स खात्यावर यासंदर्भात पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की,'पीआयबी फॅक्ट-चेकने एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केले आहे की कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सर्व पेन्शनधारकांना एक आपत्कालीन सूचना जारी केली आहे ज्यामध्ये म्हटले आहे की जर त्यांनी २८ जुलै २०२५ पर्यंत नवीन पेन्शन फॉर्म सादर केला नाही तर त्यांचे पेन्शन थांबवले जाईल.ही पूर्णपणे अफवा आहे, हा दावा खोटा आहे.'

त्यामुळे यामध्ये खातेदारांना केवळ अधिकृत सोशल मिडिया खातेच पाहण्याचा सल्ला दिला गेला.यापूर्वी ईपीएफओकडून पीएफ (भविष्यनिर्वाह निधी Provident Fund) निधी खात्यातून काढण्याची रक्कम १ लाखांहून वाढवत ५ लाख केली होती. याबाबत सरकारने म्हटले आहे की, या वाढीचा लाखो सदस्यांवर सकारात्मक परिणाम होईल, ज्यामुळे त्यांना आवश्यक निधी अधिक जलदगतीने मिळू शकेल. याशिवाय सरकारने या निधीवर ८.२५% व्याजदर मंजूर केला होता. आता हा ईपीएफओ निधी थेट एटीएम, युपीआय खात्यातून काढता येणार आहे. यासाठी खाते धारकांना आपले खाते युपीआय (Unified Payment Interface UPI) शी संलग्न करावे लागणार आहे.

सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफओ त्यांच्या सदस्यांना ईपीएफ खात्यांमधून थेट पैसे काढण्याची परवानगी देऊ शकत नाही कारण संस्थेकडे कोणतेही बँकिंग परवाने सध्या नाहीत.

३ दिवसात होणार Auto Settlement!

पूर्वीच्या पैसे काढण्याच्या क्लिष्ट प्रक्रियेच्या तुलनेत संस्थेने आता नवी पैसै काढण्याची प्रणाली काढली आहे ज्यामध्ये तुम्ही नवीन ऑटो-सेटलमेंट सिस्टीम अंतर्गत, सदस्यांना आता त्यांचे आगाऊ पैसे काढण्यासाठी 3 दिवसांच्या आत स्वयंच लितपणे प्रक्रिया करता येणार आहे.पूर्वी ही सुविधा फक्त 1 लाख रुपयांपर्यंतच्या दाव्यांसाठी होती. या सुधारणेमुळे लाखो ग्राहकांना फायदा होईल आणि गरजेच्या वेळी निधी जलद उपलब्ध होईल याची खात्री मिळू शकेल.
Comments
Add Comment

कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी

कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी पॅनल क्र. 1 : बीजेपी - वरुण पाटील ( विजयी ) शिवसेना -

“महायुतीचा धडाका: मुंबईत महापौर आमचाच!

विकासाच्या अजेंड्यावर जनतेची मोहोर मुंबईकरांनी अन्य ब्रँडला नाकारले - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे” ठाणे

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

मुंबईकरांच्या सेवेचे नवे पर्व

दोन्ही ठाकरेंपेक्षा एकट्या भाजपला अधिक जागा मुंबई - मुंबईत दोन्ही ठाकरेंच्या एकुण जागांपेक्षा एकट्या भाजपाला

BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी

मुंबई महापालिका निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी प्रभाग १ - रेखा राम यादव, शिवसेना प्रभाग २ - तेजस्वी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७