"स्वबळाची परिक्षा होणार की नाही, पक्षातील वरिष्ठ नेते ठरवतील," गिरीश महाजन स्पष्टच बोलले...

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरवात केली. तसेच महायुतीला विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळालं होत. त्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीला किती जागा जिंकता येणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणुकी संदर्भात बोलताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य केले आहे.


महायुतीत जागा वाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही. विधानसभेत ज्या जागा पक्षाच्या चिन्हावर लढवल्या गेल्या, त्या जागा देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लढवल्या जातील. कारण त्या जागा आमच्याच आहेत. जर युतीत गुंतागुंतीचा विषय ठरत असेल तर त्यावर चर्चा काढून तोडगा काढण्यात येईल. महायुतीतील सर्व घटक पक्षांचा विचार करुनच निडवणुकींचा निर्णय घेणार आहोत. फार काही तोडगा निघाला नाही तर मैत्री पूर्ण लढत होऊ शकते, तेसच स्वबळाची परिक्षा होणार की नाही, पक्षातील वरिष्ठ नेते ठरवतील. असंं गिरीष महाजन यांनी म्हटलं आहे.


खडसे साहेबांना सांगा मी बाल स्वयंसेवक होतो...


मी भाजपात होतो तेव्हा गिरीष महाजन सामान्य कार्यकर्ते होते, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला होता. पत्रकारांच्या प्रश्नांवर महाजन यांनी प्रतिक्रिया दिली, "बरोबर आहे मी साधा कार्यकर्ताच आहे. लहानपणापासून मी संघाचा स्वयंसेवक आहे, खडसे साहेबांना म्हणा मी बाल स्वयंसेवक होतो,  मी भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता होतो.  तालुक्याचा  त्यानंतर जिल्ह्याचा मग राज्याचा झालो. हे १९९० साली आले, मी शाळेत होतो, तेंव्हापासून शाखेत जात होतो. मी त्यांना कार्यकर्ता म्हणणार नाही,  त्यांना नेताच म्हणेल."असं महाजन यांनी म्हटलं आहे.


गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरु आहे.  यावर देखील महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. नाराजी मित्र पक्षातही असते काल आमची सर्वांची बैठक झाली. दोघांमध्ये कुठेही नाराजी नाही. नाराजी माध्यमांमधून दिसते आमच्या सर्वांमध्ये एकमत आहे. एकमतांच्या सल्ल्याने पुढच्या निवडणुका लढणार असे महाजन यांनी प्रतिक्रिया दिली..


Comments
Add Comment

मुंबई महापालिकेच्या दुकाने आस्थापना विभागातील रिक्त पदे भरणार

सुविधाकारांची ४८ रिक्तपदे खात्यांतर्गत लिपिकांमधून भरणार ऑनलाईन परीक्षेसाठी आयबीपीएस संस्थेची निवड मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालय २० ते २५ मिनिटे अंधारात

शॉर्टसर्कीटमध्ये बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित कोट्यवधीचा अर्थसंकल्प, पण महापालिका मुख्यालयात लिफ्टच्या

वांद्रे आणि खार पश्चिम भागात रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्‍या जल अभियंता विभागामार्फत वांद्रे पश्चिम येथील पाली हिल

अनुसूचित जातीच्या विविध रिक्त्त पदांच्या भरतीचा अनुशेष भरा!

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे मुंबई महानगरपालिकेला निर्देश मुंबई (खास प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य

मुंबईतील कुर्ला परिसरात गॅस पाइपलाइन गळतीमुळे लागली आग

मुंबई : कुर्ला पश्चिमे येथील विनोबा भावे नगरमधील एलआयजी कॉलनीच्या मागे असलेल्या मुबारक इमारतीत दुपारी गॅस

नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीतून पीडितांच्या न्यायाची हमी

मुंबई : ब्रिटिशकालीन फौजदारी कायद्यांमध्ये डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील पुरावे गृहीत धरण्याची तरतूद