डॉक्टरकडून सहकारी महिला डॉक्टरला गंडा

विवाहाचे आमिष; साडेसात लाखांची फसवणूक


नाशिक : समाजमाध्यमाद्वारे महिलेशी ओळख करून तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून, एका तरुणाने महिलेला साडेसात लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार आरोपी स्वप्नील देवरे याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डंबाळे करीत आहेत.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही ३५ वर्षीय असून, ती मूळची जळगावची राहणारी असून, मुंबई येथे नोकरी करते. आरोपी स्वप्नील संजय देवरे (वय ३५, रा. बळीराज मंदिराजवळ, नाशिक) याने मार्च २०२५ ते दि. २२ जून २०२५ या कालावधीत नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे फिर्यादी महिलेशी ओळख केली.


त्यानंतर जीवनसाथी मेट्रोमोनी व फेसबुक या ऑनलाईन अ‍ॅपद्वारे फिर्यादीशी अधिकची ओळख केली. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या मुलांची अधिकची काळजी घेत असल्याचे भासवून आपण लवकरच लग्न करू, असे फिर्यादीला वारंवार सांगून फिर्यादीचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर आरोपी स्वप्नील देवरे याने त्याच्या कोटक महिंद्रा बँक, पिंपळगाव बसवंत शाखेच्या अकाऊंटवर फिर्यादीच्या स्टेट बँक भुसावळ शाखेच्या खात्यावरून ८० हजार रुपये, दि. ६ एप्रिल रोजी पाच लाख रुपये, दि. १० एप्रिल रोजी १ लाख ५० हजार रुपये व २८ एप्रिल २०२५ रोजी फिर्यादी महिलेच्या आयसीआयसीआय बँकेच्या चाळीसगाव शाखेच्या खात्यावरून आरोपी देवरे यांच्या कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यावर फोन पेद्वारे ३० हजार रुपये अशी एकूण ७ लाख ६० हजार रुपये इतकी रक्कम स्वीकारली; मात्र ही रक्कम फिर्यादीला परत न करता महिलेची आर्थिक फसवणूक केली. महिलांनी समाज माध्यम वापरताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

चंद्रपूर-यवतमाळ एसटीला अपघात

करंजी : करंजीजवळ महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बसला झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि दहा जण गंभीर

हॉलतिकीट नाही म्हणून परीक्षा नाही, विद्यार्थी गेले थेट पोलीस ठाण्यात ; धक्कादायक परीक्षा व्यवस्थापन

छत्रपती संभाजीनगर : मास्टर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनच्या (एमसीए) विद्यार्थ्यांना हॉलिकीट मिळाले नाही. यामुळे हे

उद्या मुंबईतील शाळांना सुट्टी; शाळा बंद आंदोलनाला मुंबई मुख्याध्यापक संघटनेचा जाहीर पाठिंबा

मुंबई: राज्यातील शिक्षक बांधवांच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय

Vasantdada Sugar Institute : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीला वेग; १७ वर्षांचा आर्थिक लेखाजोखा मागवला

मुंबई : शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या आर्थिक व्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी सुरू

महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू?

राज्य निवडणूक आयोगाची आज आयुक्तांसोबत बैठक २७ महानगरांचे सोपे गणित, ५०% आरक्षणात जिल्हा परिषदा