काय सांगता ? २३ वर्षांची जान्हवी डांगेती करणार अंतराळ प्रवास

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशमधील जान्हवी डांगेती ही २३ वर्षांची तरुणी टायटन्स स्पेसच्या अ‍ॅस्ट्रॉनॉट कँडिडेट मोहिमेंतर्गत अंतराळात प्रवास करणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर असलेल्या जान्हवीची टायटन्स स्पेस ऑर्बिटल फ्लाइटमध्ये प्रवास करण्यासाठी निवड झाली आहे. हा प्रवास पाच तास चालेल.

निवड झाल्याचे जाहीर होताच जान्हवीने एक इन्स्टा पोस्ट करुन कृतज्ञता व्यक्त केली. जान्हवीने इंस्टाग्रामवर लिहिले की ही निवड झाल्यामुळे तिला खूप सन्मानित झाल्यासारखे वाटत आहे. मोहिमेसाठीचा तिचा उत्साह एकदम वाढला आहे.

टायटन्स स्पेस ऑर्बिटल फ्लाइटचा पहिला प्रवास २०२९ मध्ये होणार आहे. यात तीन तास शून्य गुरुत्वाकर्षणाचा अनुभव मिळेल. या मोहिमेद्वारे अंतराळ क्षेत्रातील संशोधनात तरुणांना अधिकाधिक प्रमाणात आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जान्हवीच्या मते हा प्रवास संशोधन आणि मानवी अंतराळ उड्डाण प्रगतीसाठी प्रेरणादायी असा मैलाचा दगड ठरेल, इथून नव्या बदलांना सुरुवात होईल.

नियोजनानुसार २०२९ मध्ये होणार असलेल्या अंतराळ प्रवासात अंतराळवीर पृथ्वीभोवती दोनदा प्रदक्षिणा घालतील आणि दोन सूर्योदय आणि दोन सूर्यास्त पाहतील. या मोहिमेचे नेतृत्व नासाचे अनुभवी अंतराळवीर आणि निवृत्त अमेरिकन सैनिक कर्नल विल्यम मॅकआर्थर ज्युनियर करणार आहेत. ते टायटन्स स्पेससाठी मुख्य अंतराळवीर म्हणून काम करतात.

जान्हवीचे अंतराळ मोहिमेसाठी विशेष प्रशिक्षण होणार आहे. याआधी तिने विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणिताच्या क्षेत्रात भरपूर संशोधन केले आहे. अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रातही ती कार्यरत आहे. तिने शून्य गुरुत्वाकर्षण, उच्च उंचीवरील मोहिमा, स्पेस सूट ऑपरेशन्स आणि प्लॅनेटरी सिम्युलेशनमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. नासाच्या आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ कार्यक्रमासाठी निवड झालेली ती पहिली भारतीय आहे.

टायटन्स स्पेसकडून अंतराळ मोहिमेसाठी जान्हवीला २०२६ पासून विशेष प्रशिक्षण दिले जाईल. या विशेष संधीसाठी जान्हवीने टायटन्स स्पेसचे आभार मानले आहेत. एका स्वप्नाची पूर्तता करण्याच्या दिशेने प्रवास सुरू करत असल्याचे सांगत जान्हवीने आनंद व्यक्त केला आहे.
Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे