आषाढ वारीत डीजे, साउंड सिस्टिम टाळा

काटेवाडी : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या आषाढ पालखी सोहळ्यामध्ये टाळ, मृदंग, वीणा आणि अखंड चालणारा नामघोष यांचा भक्तिमय नाद हा वारीचा आत्मा आहे. ही पारंपरिक वाद्ये वारकऱ्यांच्या भक्तीला सूर देतात आणि पालखी मार्गावर आध्यात्मिक वातावरण निर्मिती करतात. मात्र, काही ठिकाणी पालखीच्या स्वागतासाठी लावण्यात येणाऱ्या डीजे आणि मोठ्या साउंड सिस्टीममुळे हा मंगलमय नाद दबला जात आहे. यामुळे वारकऱ्यांमध्ये नाराजी आहे. पालखीचे स्वागत साध्या पद्धतीने, लेझीम, टाळ, मृदंग आणि वीणेच्या भक्तिमय नादात करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.



टाळ, मृदंग आणि वीणा ही वाद्ये आषाढ वारीच्या परंपरेचा अविभाज्य भाग आहेत. ही वाद्ये केवळ संगीतमय नाहीत, तर ती वारकऱ्यांच्या श्रद्धेचे प्रतीक आहेत, जी पिढ्यानपिढ्या चालत आली आहेत. या वाद्यांच्या नादातून संतांच्या भक्तीचा आणि त्यागाचा संदेश पालखी मार्गावर पसरतो. दोन वर्षांपूर्वी पालखी मार्गावर डीजे आणि साउंड सिस्टीमचा प्रचंड दणदणाट ऐकू येत असे. यामुळे वारकऱ्यांना भजन, अभंग, काकडा, मंगलचरण आणि हरिपाठ गायन थांबवावे लागत होते. प्रशासनाने यावर काही प्रमाणात नियंत्रण आणले असले, तरी पूर्णपणे बंदी आलेली नाही. यामुळे पालखी सोहळ्याच्या पावित्र्याला आणि शांतीला बाधा येत आहे. त्यामुळे वारकऱ्यांनी प्रशासनाकडे डीजे आणि साउंड सिस्टीमवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला