हिंदुधर्म योद्धा!

प्रियांका साळस्कर : माजी नगराध्यक्षा, देवगड


दि.२३ तारीख साहेबांना नेहमीच शुभ ठरली. दि. २३ जून पालकमंत्री तथा मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस आणि माझी मुलगी अपेक्षा हिचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. सकाळी साहेबांना शुभेच्छा द्यायच्या आणि माझ्या मुलीचा वाढदिवस संध्याकाळी साजरा करायचा. हा दरवर्षीचा कार्यक्रम असतो.


२०१४ साली साहेब आमदार झाले आणि त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. २२ मार्च २०१६ मध्ये देवगड-जामसंडे नगरपंचायतीची स्थापना झाली. २०१६ मध्ये देवगड-जामसंडे नगरपंचायत निवडणूक झाली. २३ डिसेंबर २०१६ ला पहिली नगराध्यक्षा म्हणून मला नारायण राणे साहेब व नितेश राणे, निलमवहिनी राणे यांच्याकडून संधी दिली गेली. नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व नगरसेवकांनी विकास केला. सत्ता नसली तरी नितेश राणेंनी विकास निधी मिळवून देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे नाव महाराष्ट्रात, देशात उज्ज्वल केले.


साहेबांची नेहमीच विकासाची भूमिका, त्यांची दूरदृष्टी होते म्हणून त्यांनी देवगड पवनचक्की गार्डन, वॅक्स म्युझियम, कंटेनर थिएटर, झीप लाईन लोकांना आकर्षित करणारे प्रकल्प आणले. खऱ्या अर्थाने देवगड तारामुंबरी-मिठमुंबरीला जोडणारा रस्ता झाला नव्हता, पण साहेबांनी जमीन मालकांशी सकारात्मक चर्चा करून जमिनीचा प्रश्न मिटला. जेव्हा रस्ता सुरू झाला तेव्हा मालवणहून कुणकेश्वरकडे येणारे पर्यटक देवगडकडे वळू लागले. त्यामुळे आज देवगड-जामसंडेमधील व्यवसायिकांना त्याचा फायदा झाला. (हॉटेल, लॉजिंग, आंबा विक्रेते) नगरपंचायतीमध्ये काम करताना नितेश राणेंनी नेहमीच महिला म्हणून मला मोठा सन्मान दिला. तसेच नेहमी सर्व नगरसेवकांनी चांगल्याप्रकारे काम करावे, यासाठी ही प्रवृत्त केले. मला नगराध्यक्षा म्हणून दोनदा संधी मिळाली. राणे कुटुंबीयांकडून नेहमीच मला त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य असाच मान मिळाला.


देवगड-जामसंडेमधील नागरिकांना पाणीपुरवठा व्यवस्थित व्हावा म्हणून नितेश राणेंनी निधी मिळवून दिला. पाच वर्षे काम करताना आम्हाला जे समाधान मिळाले ते साहेबांमुळेच. आज नितेश राणे मत्स्य व बंदरे विकास मंत्री, कॅबिनेटमंत्री, पालकमंत्री झाले. याचा सर्व सिंधुदुर्गवासीयांना अभिमान आहे आणि आनंद, समाधान आहे. आज जे नितेश राणंेनी मिळवले आहे ते त्यांच्या कर्तृत्वाने. अशा नेत्याचा आम्हाला अभिमान आणि गर्व आहे. त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी, ही श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना! आणि नितेश राणेंना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा !! आज नितेश राणे हिंदुधर्म योद्धा विधानसभेमध्ये, अधिवेशनामध्ये लोकांचे प्रश्न, समस्या, पोटतिडिकीने मांडतात. नितेश राणे कायम सर्वांचे फोन घेतात आणि त्यांच्या समस्या सोडवतात. पत्रकार परिषदेमधून मुद्देसूद मत मांडणे अशाप्रकारे नेहमी कार्यरत असतात. नगरपंचायतीला चार कचरा संकलन गाड्या दिल्या. नितेश राणेंचे सतत गावसंपर्क, कार्यकर्ता मोठा मानून त्याला सांभाळणे हे त्यांचे परमकर्तव्य समजतात. मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Comments
Add Comment

महिला सक्षमीकरणाचा मानबिंदू

वेध-सीमा पवार   भारतीय सशस्त्र दलात महिलांचे वाढते योगदान हे देशाच्या बदलत्या सामाजिक आणि व्यावसायिक

रोजच्या ताटात विष!

प्रासंगिक-विवेक कांबळे   माणसाच्या मूलभूत गरजांपैकी सर्वांत महत्त्वाच्या असलेल्या अन्नातच किती मोठ्या

बालपणाचा बदलता चेहरा

मागोवा-वैष्णवी भोगले   एखाद्या समाजाचे भविष्य काय असेल, याचा अंदाज त्या समाजातील मुलांच्या बालपणाकडे पाहून

वसईच्या ‘बशी’ला आता ‘देवा’कडूनच अपेक्षा!

निमित्त-गणेश पाटील   वसई-विरार शहराचा आकार बशीसारखा उंच-सखल असल्याने येथे दरवर्षी पावसाचे पाणी साचते,” हे

खाद्यसंस्कृतीचा जागतिक दस्तावेज

नोेंद- अनिता बागवे छायाचित्र म्हणजे केवळ दृश्य नोंद नाही; ती एक कथा असते, हे सिद्ध करणारी 'वर्ल्ड फूड फोटोग्राफी

महिला शेतकऱ्यांना न्याय

फोकस-संदीप खांडगेपाटील   राज्य सरकारमुळे महिला शेतकऱ्यांना आता खऱ्या अर्थांने न्याय मिळाला. शेतात राबणाऱ्या